#gallery-1 { margin: auto; } #gallery-1 .gallery-item { float: left; margin-top: 10px; text-align: center; width: 33%; } #gallery-1 img { border: 2px solid #cfcfcf; } #gallery-1 .gallery-caption { margin-left: 0; } /* see gallery_shortcode() in wp-includes/media.php */ पिंपरी, दि. २५ (प्रतिनिधी) – पिंपरी चिंचवड शहरातील ज्येष्ठ नेते व माजी महापौर आझम पानसरे यांचे पुत्र निहाल पानसरे यांनी अजित पवार यांच्या उपस्थितीत गुरूवारी (दि. २५) राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. अनेकांचा भाजपामध्ये प्रवेश सुरू असताना पानसरे यांच्या प्रवेशामुळे पिंपरी चिंचवड भाजपाला मोठा धक्का बसला आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीसाठी राजकीय आखाडा रंगला आहे. भाजप आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये महापालिका जिंकण्यासाठी मोठी चढाओढ सुरू आहे. त्यासाठी मोठ्या प्रमाणावर पक्षप्रवेश होत आहेत. नुकतेच भाजापामध्ये झालेल्या काही माजी नगरसेवकांच्या प्रवेशानंतर राष्ट्रवादीने देखील भाजपला धक्का दिला आहे. आझम पानसरे हे शहरातील ज्येष्ठ नेते असून त्यांच्या नावाला राजकीय वलय आहे. त्यामुळे निहाल यांच्या प्रवेशांने भाजपाला हा मोठा धक्का असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.