“जमाई राजा’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली निया शर्मा छोट्या पडद्यावरील एक लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. निया अभिनयासोबतच सोशल मीडियावरील मादक फोटोंमुळेही चर्चेत असते. सध्या निया गोवा येथे सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. दरम्यान तिने गोव्याच्या समुद्र किनारी केलेलं फोटोशूट सध्या प्रचंड चर्चेत आहे.
@Theniasharma insta post!!
" Good times, Tan lines.. " pic.twitter.com/fmshK7gOdU
— Fazmina Noordeen ツ (@n_fazmina) December 4, 2020
तिने हे ग्लॅमरस फोटो आपल्या ट्वीटरसह इन्स्टाग्राम अकाउंटवर देखील शेअर केले आहेत. या फोटोंमधील तिचा बोल्ड अवतार पाहून चाहते सेलिब्रिटी देखील अवाक झाले आहेत. “इतकं बोल्ड दिसणं तुला कसं जमतं?” अशी प्रतिक्रिया बॉलिवूड अभिनेता सुधांशु पांडे याने दिली आहे. तिच्या या फोटोंवर नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे.
ट्वीटर आणि इन्स्टाग्रामवर या फोटोजना लाईक्स आणि कॉमेंटस मजबूत मिळाल्या असून तिचं फॅन फॉलोईंगही वाढत असल्याचं दिसून येत आहे.