Neymar ACL Injury – ब्राझीलचा स्टार फुटबॉलपटू असलेला नेमार अल-हिलाल क्लबसाठी पुनरागमन करण्यास सज्ज नसल्याची घोषणा अल-हिलाल क्लबचे मुख्य प्रशिक्षक जॉर्ज जीसस यांनी केली. ऑगस्ट २०२३ मध्ये रियाध संघासाठी नेमारने करार केला होता. मात्र ब्राझील संघाकडून खेळताना त्याच्या डाव्या गुडघ्याला दुखापत झाल्याने शस्त्रक्रिया करावी लागली होती. त्यामुळे त्याने केवळ पाच लढतींमध्ये अल-हिलाल क्लबचे प्रतिनिधित्व केले आहे. जुलै महिन्यात प्रशिक्षणासाठी परातल्यानंतर तो लवकरच पुनरागमन करेल अशी सर्व फुटबॉलप्रेमींना आशा होती मात्र, अल-हिलाल क्लबचे मुख्य प्रशिक्षक असलेल्या जॉर्ज जीसस यांनी नेमार एवढ्यात पुनरागमन करणार नसल्याचे सांगितले. SAFF U17 C’ship 2024 : उपांत्य फेरीसाठी आधीच पात्र, भारताचा मालदीववर दणदणीत विजय…. नेमार हा आमच्या क्लबसाठी महत्वाचा खेळाडू आहे. तो संघात कधी पुनरागमन करेल हे आताच सांगता येणार नाही, जानेवारीपर्यंत परिस्थिती पाहू, असे प्रशिक्षक जॉर्ज जीसस बोलताना म्हणाले. सौदी प्रो लीग (एसपीएल)च्या दुसऱ्या सहामाही हंगामामध्ये नेमार परतेल, अशी आशा आहे.