पिंपरी | महिलांना दिला वृत्तपत्र, तुळशीचा वाण

पिंपळे गुरव,(वार्ताहर) – विनायकनगरमधील प्रीती संजय मराठे यांनी मकर संक्रांतीच्या सणानिमित्त हळदी-कुंकू समारंभाचे आयोजन केले होते. सदर समारंभात सुवासिनी महिलांनी गर्दी केली होती. या वेळी महिलांना वृत्तपत्र, तुळशीचे रोप, कापडी पिशवी वाण म्हणून देण्यात आले.
या वेळी प्लॅस्टिकचा वापर टाळा, कापडी पिशव्यांचा वापर करा. भारतीय संस्कृतीमध्ये तुळशीला खूप महत्त्व आहे. म्हणून सर्व स्त्रियांना तुळशीचे रोप देण्यात आले. मोबाइलमुळे महिलांचे वाचन कमी झाले आहे. महिलांनी दररोज वाचन करावे. यासाठी विविध दैनिक वृत्तपत्र देत ‘वाचाल तर वाचाल’ हा सामाजिक संदेश देत आदर्श निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला असल्याचे प्रीती मराठे यांनी या वेळी सांगितले.
कल्पना वनशिव, कोमल गोंडाळकर, ज्योती शिंगाडे, नीलम कुलकर्णी, हर्षा चौधरी, शताब्दी फणसे, अंजली डावके, शिल्पा राऊत, करुणा खोपडे, जयश्री जंगम, ज्योती आव्हाड, उज्ज्वला पाटील, शालेय यादव, अपर्णा शेंडे, सीमा कांबळे, अंजली जगताप, ज्योती आगरवाल, ज्योती नाणेकर, संतोषी माने, प्रिया भोसले, रोहिनी कांबळे, शैलजा इंगवले, निवेदिता बाराथे, माया भोसले या वेळी उपस्थित होते.





