Video : पुण्यात किरीट सोमय्यांना शिवसैनिकांकडून धक्काबुक्की; पायऱ्यांवरून कोसळले

Updated On:

पुणे – भाजपनेते  माजी खासदार किरीट सोमय्या मागील अनेक दिवसांपासून महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांचे घोटाळे बाहेर काढण्यात आघाडीवर आहेत. मात्र त्यांच्यावर अनेकदा स्वपक्षातील भ्रष्टाचाराकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करण्यात येत होता. त्यातच आज सोमय्या यांना  पुण्यात शिवसेनिकांच्या रोषाला सामोरं जावं लागलं.

महापालिका आयुक्तांच्या भेटीसाठी आलेल्या किरीट सोमय्या यांना आयुक्ताची भेट न घेताच परतावे लागले. सोमय्या महापालिकेत येणार असल्याची माहिती मिळताच मोठ्या संख्येने शिवसैनिक महापालिकेत जमले होते. मात्र सोमय्या नवीन इमारतीच्या प्रवेशद्वारात येणार असल्याची माहिती मिळताच सर्व शिवसैनिक नव्या इमारती समोर गेले.

सोमय्या नवीन इमारतीच्या प्रवेशद्वाराने आले. त्यानंतर जुन्या प्रवेशद्वारात असलेल्या शिवसैनिकांनी त्यांना पालिकेतील भ्रष्टाचार बाहेर काढा अशी मागणी करत अडविले. त्यानंतर सोमय्या त्यांना भेटले. मात्र सोमय्या नवीन इमारतीत आल्याचे कळताच सर्व शिवसैनिक प्रवेशद्वारात आले आणि त्यांनी त्याची वाट अडवली.

त्यानंतर काही समजण्याच्या आताच धक्काबुक्की सुरू झाली. त्यानंतर एवढा गोंधळ झाली की सोमय्या यांचे सुरक्षा रक्षक बाजूला फेकले गेले. त्यानंतर सोमय्या यांना धक्काबुक्की करुन खाली पाडले तसेच मारहाण करण्यात आली. शिवाय गाडीवर लाथा बुक्क्या मारण्यात आल्या. त्यामुळे सोमय्या यांना जीव मुठीत घेऊन गाडीत बसावे लागले.

यावेळी शिवसैनिकांनी त्यांचा ताफा अडवत गाडीवर आदळआपट केली. त्यातून ताफा कसा बसा बाहेर निघाल्यानंतर पुणे महापालिकेच्या आऊट गेटवर गाडी अडावत आंदोलकांनी पुन्हा गाडीवर जोर जोरात बुक्क्या मारत गोंधळ घातला. हा गोंधळ जवळपास पाच ते दहा मिनिट सुरू होता.

आणखी संबंधित बातम्या

Shivneri Fort: शिवनेरी गडाच्या परिसरात अतिक्रमण? किरीट सोमय्यांचा प्रशासनाला ७ दिवसांचा अल्टीमेटम

2026-09-08 04:15:11

Shivneri Fort: शिवनेरी गडाच्या परिसरात अतिक्रमण? किरीट सोमय्यांचा प्रशासनाला ७ दिवसांचा अल्टीमेटम

Ozar News : श्री क्षेत्र ओझर येथील महादेव मंदिराचा प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोहळा उत्साहात संपन्न

2026-09-07 19:02:12

Ozar News : श्री क्षेत्र ओझर येथील महादेव मंदिराचा प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोहळा उत्साहात संपन्न

pune : फूटपाथसाठी पालिका ८८ कोटी खर्च करणार

2026-09-02 07:50:58

pune : फूटपाथसाठी पालिका ८८ कोटी खर्च करणार

MP IAS Transfer : 32 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; महापालिका आयुक्तही बदलले

2026-08-21 17:58:38

MP IAS Transfer : 32 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; महापालिका आयुक्तही बदलले

Rajesh Sawant Death : महाराष्ट्रातील भाजप नेत्याचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन; CM फडणवीसांनी व्यक्त केले दुःख

2026-08-06 18:28:30

Rajesh Sawant Death : महाराष्ट्रातील भाजप नेत्याचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन; CM फडणवीसांनी व्यक्त केले दुःख