पक्षाध्यक्षपद सोडणार असल्याच्या बातम्या मुर्खपणाच्या – लालू भडकले
Updated On:

नवी दिल्ली – आगामी लोकसभा निवडणुकीच्यावेळी लालूप्रसाद यादव हे राष्ट्रीय जनता दल पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देतील आणि तेजस्वी यादव हे पक्षाचे नवीन अध्यक्ष होतील अशा बातम्या सध्या प्रसारीत होत आहेत, पण या बातम्या म्हणजे निव्वळ मुर्खपणाच्या आहेत, मी पक्षाध्यक्षपदी कायम राहणार आहे असे लालूप्रसाद यादव यांनी म्हटले आहे.
काल लालूंचे पुत्र तेजप्रताप यादव यांनीही या वृत्ताचे खंडण केले होते, त्यांनी स्पष्ट केले होते की, लालूप्रसाद यादव हे पक्षाचे सक्षम नेते आहेत आणि ते पक्ष चालवण्यास पुर्णपणे समर्थ असल्याने तेच पक्षाचे अध्यक्ष म्हणून काम करतील.
राष्ट्रीय जनता दल पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारीणीची बैठक येत्या 10 तारखेला पाटणा येथे होत आहे. या बैठकीला पक्षाध्यक्ष म्हणून लालूप्रसाद यादव हे उपस्थित राहतील.





