कोल्हापूर | शहरात 15 ते 18 वर्ष वयोगटातील विद्यार्थ्यांचे 100 टक्के लसीकरण पूर्ण

कोल्हापूर (प्रतिनिधी) : शहरामध्ये 3 जानेवारी 2022 पासून महाविद्यालय व शाळेतील 15 ते 18 वर्ष वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या विशेष लसीकरण कॅम्पमध्ये 28802 विद्यार्थांचे लसीकरण पुर्ण करण्यात आले आहे. हे लसीकरण आजअखेर 100 टक्के पुर्ण झाले आहे. तर प्रिकॉशन डोसमध्ये हेल्थ केअर वर्कर, फ्रंट लाईन वर्कर व 60 वर्षावरील व्याधिग्रस्त 299 नागरिकांना हा प्रिकॉशन डोस देण्यात आला आहे. यामध्ये हेल्थ केअर वर्कर 122, फ्रंट लाईन वर्कर 53 व 60 वर्षावरील 124 व्याधिग्रस्त नागरीकांना प्रिकॉशन डोस देण्यात आला.
मंगळवारी शहरामध्ये महाविद्यालय व शाळेतील 15 ते 18 वर्ष वयोगटातील 663 विद्यार्थांचे लसीकरण करण्यात आले. सकाळी 9 ते 11 या वेळेमध्ये शहरातील 2 महाविद्यालयामध्ये हे विशेष लसीकरण मोहिम राबविण्यात आले. यामध्ये चाटे हायस्कूल माध्यमिकमध्ये 163 व आयटीआय कॉलेज कळंबामध्ये 500 विद्यार्थांचे लसीकरण करण्यात आले.
बुधवार दि.19 जानेवारी 2022 रोजी शाहू दयानंद हायस्कूल, कोल्हापूर हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, देशभूषण विद्यामंदीर हायस्कूल, श्रीमंत माईसाहेब बावडेकर माध्यमिक विद्यालय, आर के वालावलकर प्रशाला येथे 15 ते 18 वयोगटातील विद्यार्थ्यांना लसीकरण करण्यात येणार आहे. तसेच सकाळी 8 ते रात्री 9 यावेळेत सर्व प्राथमिक नागरी आरोग्य केंद्रात 18 वर्षावरील नागरीकांना कोविड लसीच्या पहिल्या व दुसऱ्या डोसकरीता ऑनस्पॉट रजिस्ट्रेशनद्वारे लसीकरण करण्यात येणार आहे.
शहरात 2,188 नागरीकांचे लसीकरण
महापालिकेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात 2188 नागरीकांचे लसीकरण करण्यात आले. यामध्ये हेल्थ केअर वकर्स 154, फ्रंन्टलाईन वर्कर्स 78 तर 15 ते 18 वर्षापर्यंत 317, 18 ते 45 वर्षापर्यंत 1063 नागरीकांचे लसीकरण करण्यात आले. तर 45 ते 60 वर्षापर्यंत 276 नागरीकांचे व 60 वर्षावरील 246 नागरीकांचे लसीकरण करण्यात आले. शहरामध्ये आज अखेर 6,80,687 आरोग्य कर्मचारी व फ्रंटलाईन वर्कर्स व नागरीकांचे लसीकरण करण्यात आले आहे.





