उत्तराखंडमध्ये भाजपने केली मंत्र्याची हकालपट्टी; मंत्र्याला कोसळले रडू

Updated On:

डेराडून – भारतीय जनता पक्षाच्या उत्तराखंड सरकार मधील मंत्री हरकसिंह रावत यांची काल मध्यरात्री राज्याच्या मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्यात आली आहे. पक्षाने आपल्याशी चर्चा न करताच परस्पर हा निर्णय घेतल्याने मंत्र्यांना रडू कोसळले.

एका वाहिनीला मुलाखत देताना त्यांना हे रडू कोसळले. आता ते कॉंग्रेस मध्ये घरवापसी करणार असल्याचे सांगितले जात आहे. राज्यात कॉंग्रेसचेच सरकार सत्तेवर येईल असे भाकितही त्यांनी केले आहे.

त्यांच्या हकालपट्टीचे नेमके कारण अजून स्पष्ट होत नाही. त्यांनी आपल्या घरातील अन्य व्यक्तींच्या तिकीटांचा आग्रह धरल्याने त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आल्याचे भाजप सूत्रांचे म्हणणे आहे.

तथापि त्यांच्या विरोधात पक्ष विरोधी कारवायांचाही ठपका ठेवण्यात आला आहे. या संबंधात हरकसिंह रावत यांनी सांगितले की आपल्याला भाजपच्या नेत्यांनी दिल्लीत चर्चा करण्यासाठी बोलावले होते. परंतु मला प्रवासातील अडचणीमुळे तिकडे जाण्यास विलंब झाला.

मी दिल्लीला जाऊन गृहमंत्री अमित शहा आणि केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्याशी चर्चा करणार होतो पण त्याच्या आधीच आपली पक्षाने हकालपट्टी केली असे सांगताना त्यांना रडू कोसळले. त्यांची आता कॉंग्रेस प्रवेशाची चर्चा सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे.

तथापि कॉंग्रेसचे उत्तराखंड मधील प्रमुख नेते हरिष रावत यांनी मात्र त्यांना पक्षात पुन्हा प्रवेश देण्यास नकार दिल्याचे सांगण्यात येते. त्यांनी कॉंग्रेस मध्ये असताना आपल्या विरोधात काम केले होते असे त्यांचे म्हणणे आहे. सहा वर्षांपुर्वी ते कॉंग्रेस मधून भाजपत गेले होते.

आणखी संबंधित बातम्या

Devendra Fadnavis : शेतकऱ्यांना मोठा दिलासा ! कर्जमाफी योजनेतील 'ती' अट सरकारकडून रद्द

2026-07-10 19:33:33

Devendra Fadnavis : शेतकऱ्यांना मोठा दिलासा ! कर्जमाफी योजनेतील 'ती' अट सरकारकडून रद्द

Mallikarjun Kharge : युपीतील भाजप सरकार दलित विरोधी; मल्लिकार्जुन खर्गे यांची टीका

2026-07-10 18:11:48

Mallikarjun Kharge : युपीतील भाजप सरकार दलित विरोधी; मल्लिकार्जुन खर्गे यांची टीका

Party joins the BJP : "भाजपमध्ये 'हा' पक्ष विलीन होणार" ; राजकारणात एकच खळबळ

2026-07-10 12:14:47

Party joins the BJP : "भाजपमध्ये 'हा' पक्ष विलीन होणार" ; राजकारणात एकच खळबळ

Harshvardhan Sapkal : "स्वतःची शेती, वाडा किंवा कुटुंबातील दागिने विकून हा प्रकल्प उभारलेला नाही"; सपकाळांचा फडणवीसांवर घणाघात

2026-07-10 08:58:47

Harshvardhan Sapkal : "स्वतःची शेती, वाडा किंवा कुटुंबातील दागिने विकून हा प्रकल्प उभारलेला नाही"; सपकाळांचा फडणवीसांवर घणाघात

Eknath Khadse : एकनाथ खडसेंची घरवापसी होणार? विनोद तावडेंनी घेतलेल्या भेटीची राजकीय वर्तुळात चर्चा

2026-07-09 20:11:58

Eknath Khadse : एकनाथ खडसेंची घरवापसी होणार? विनोद तावडेंनी घेतलेल्या भेटीची राजकीय वर्तुळात चर्चा