Yuzvendra Chahal Dhanashree Verma Divorce: भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फिरकी गोलंदाज युझवेंद्र चहल आणि त्याची पत्नी धनश्री वर्मा यांच्याबद्दल बऱ्याच दिवसांपासून चर्चा होती की दोघे एकमेकांपासून वेगळे होणार आहेत. आता या अटकळीदरम्यान चहल आणि धनश्रीने एकमेकांना इन्स्टाग्रामवर अनफॉलो केले आहे.
चहलने सर्व फोटो डिलिट केले –
इंस्टाग्रामवर एकमेकांना अनफॉलो केल्यानंतर युझवेंद्रने धनश्रीसोबतचे सर्व फोटो हटवले आहेत. त्यानंतर दोघेही एकमेकांपासून वेगळे होणार असल्याचे चाहत्यांना वाटू लागले आहे. दुसरीकडे घटस्फोटाबाबत चहल आणि धनश्रीकडून अद्याप कोणतेही वक्तव्य आलेले नाही.
हिंदी वृत्तवाहिनीच्या वृत्तानुसार, या जोडप्याच्या जवळच्या सूत्रांनी सांगितले की, घटस्फोटाच्या अफवा खऱ्या आहेत. ते काही दिवसात अधिकृतपणे जाहीर करतील. त्यांच्या विभक्त होण्याचे नेमके कारण अद्याप समजलेले नाही, परंतु हे स्पष्ट आहे की या जोडप्याने वेगळे जीवन जगण्याचा निर्णय घेतला आहे.
याआधीही चहल आणि धनश्री वर्माच्या घटस्फोटाची बरीच चर्चा झाली होती. सोशल मीडियावर प्रत्येकजण या दोघांबद्दल बोलत होते. त्यावेळी युझवेंद्रने घटस्फोटाच्या अफवा फेटाळून लावत एक पोस्ट केली होती आणि त्याच्या चाहत्यांना धनश्रीसोबतच्या त्याच्या नात्याबद्दल अफवांवर विश्वास ठेवू नका किंवा पसरवू नका असे सांगितले होते. युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांनी 11 डिसेंबर 2020 रोजी एकमेकांशी लग्न केले होते.