नवी दिल्ली – विस्डेन पुरस्कारांच्या यादीत पुन्हा यंदाही भारतीय खेळाडूंना डावलले गेल्याने खूपच निराश झालो असून त्यांचा दृष्टिकोनाचे आश्चर्य वाटते, अशा शब्दात माजी कसोटीपटू व्हिव्हिएस लक्ष्मण याने आपले मत व्यक्त केले आहे. खरेतर भारताने विश्वकरंडक स्पर्धेत अंतिम फेरीत स्थान मिळविले नव्हते तरीही रोहित शर्माच्या कामगिरीचे मोल कमी होत नाही. रोहितने विश्वकरंडक स्पर्धेत शतकांची बरसात करत एकाच विश्वकरंडक स्पर्धेत सर्वाधिक शतके फटकावत विक्रम साकार केला होता. निदान त्याचा तरी पुस्कार प्राप्त खेळाडूंमध्ये वर्णी लागायला हवी होती, असे लक्ष्मण याने व्यक्त केले. यंदा इंग्लंडचा अष्टपैलू बेन स्टोक्स याने विस्डनचा सर्वोत्तम क्रिकेटपटूचा पुरस्कार मिळविला. विश्वकरंडक तसेच एशेस कसोटी मालिकेत सातत्यपूर्ण कामगिरी केली होती व इंग्लंडला प्रथमच विश्वकरंडक स्पर्धेचे विजेतेपद मिळवून दिले. ऑशेस मालिका महत्त्वाची आहे, मात्र विश्वचषक स्पर्धा ही ऍशेसपेक्षा मोठी आहे. याच स्पर्धेत रोहितने 5 शतके फटकावली आहेत. विश्वकरंडक स्पर्धेत खेळलेल्या 9 सामन्यांत रोहितने तब्बल 5 शतकांचा समावेश होता. मात्र, तरीहीपुरस्कार प्राप्त खेळाडूंमध्ये रोहितला स्थान का दिले गेले नाही याचे मला आश्चर्य वाटत आहे, असेही लक्ष्मण याने व्यक्त केले आहे.