Gold-Silver Rates : मोठी बातमी! सोने व चांदीचे दर कोसळले
Gold-Silver Rates : मजबूत रुपया, शेअर बारातील तेजी आणि जागतिक बाजारातील मंदीमुळे व्यापारी मौल्यवान धातूंपासून दूर राहिल्याने, राष्ट्रीय राजधानीत बुधवारी 99.9 टक्के शुद्धतेच्या सोन्याच्या दरात 4,800 रुपयांची घसरण होऊन तो 1,54,400 रुपये प्रति 10 ग्रॅम (सर्व करांसहित) झाला.

Gold-Silver Rates : मजबूत रुपया, शेअर बारातील तेजी आणि जागतिक बाजारातील मंदीमुळे व्यापारी मौल्यवान धातूंपासून दूर राहिल्याने, राष्ट्रीय राजधानीत बुधवारी 99.9 टक्के शुद्धतेच्या सोन्याच्या दरात 4,800 रुपयांची घसरण होऊन तो 1,54,400 रुपये प्रति 10 ग्रॅम (सर्व करांसहित) झाला. मागील सत्रात तो 1,59,200 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाला होता.
चांदीच्या दरातही मोठी घसरण झाली असून, तो 5,300 रुपयांनी घसरून 2,55,400 रुपये प्रति किलोग्राम झाला आहे. मंगळवारी चांदीचा भाव 2,60,700 रुपये प्रति किलोवर स्थिरावला होता.
विश्लेषकांचे मत –
शेअर बाजारातील तेजीमुळे गुंतवणूकदार अधिक परताव्याच्या शोधात असल्याने, सलग दुसर्या दिवशी देशांतर्गत मागणी कमकुवत राहिली. एचडीएफसी सिक्युरिटीजचे कमोडिटीज विभागाचे वरिष्ठ विश्लेषक सौमिल गांधी म्हणाले की, यूएस फेडरल रिझर्व्हच्या पतधोरणाच्या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदारांनी सावध भूमिका घेतल्याने बुधवारी सोन्याच्या दरात घसरण झाली.
आंतरराष्ट्रीय बाजारात, स्पॉट गोल्ड किंचित घसरून 4,327.54 डॉलर प्रति औंसवर व्यवहार करत होते, तर चांदी 0.18 टक्क्यांनी घसरून 69.89 डॉलर प्रति औंसवर आली. मिराई अॅसेट शेअरखानचे कमोडिटीज विभागाचे प्रमुख प्रवीण सिंग म्हणाले, आज होणार्या यूएस फेडरल ओपन मार्केट कमिटीच्या पतधोरणाच्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर स्पॉट गोल्ड स्थिर होत आहे.
दरम्यान, शुक्रवारी होणार्या अमेरिका-इराण बैठकीकडे गुंतवणूकदार लक्ष ठेवून आहेत. औपचारिक कराराच्या दिशेने होणारी कोणतीही प्रगती भू-राजकीय अनिश्चितता कमी करू शकते, असे एलकेपी सिक्युरिटीजचे कमोडिटी आणि करन्सी विभागाचे उपाध्यक्ष जतीन त्रिवेदी म्हणाले.




