Gold Price Today: सोन्याच्या दरात मोठी वाढ; जाणून घ्या आजचा दर

नवी दिल्ली – जागतिक बाजारात सोने आणि चांदीचे दर वाढल्यामुळे भारतातही सोने आणि चांदीच्या दरात सोमवारी मोठी वाढ झाली. दिल्ली सराफात सोवारी सोन्याचे दर 877 रुपयांनी वाढून 50,619 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले. त्याचबरोबर तयार चांदीचा दर 2,012 रुपयांनी वाढून 69,454 रुपये प्रति किलो झाला.
जागतिक बाजारात सोन्याचे दर वाढून 1,935 डॉलर प्रति औंस तर चांदीचे दर 27.30 डॉलर प्रति औंस झाले. इतर चलनांच्या तुलनेत डॉलरचा भाव कमी होत असल्यामुळे सोन्याचे दर वाढत आहेत असे एचडीएफसी सिक्युरिटीज या संस्थेचे विश्लेषक तपन पटेल यांनी सांगितले.
जागतिक बाजारात भांडवल सुलभता निर्माण झाली आहे. व्याजदरही कमी पातळीवर आहेत. त्यामुळे डॉलरचा भाव ईतर चलनाच्या तुलनेत कमी होत आहे. परिणामी सोन्यातील सुरक्षित गुंतवणूकीकडे काही गुंतवणूकदार वळत असल्यामुळे सोन्याचे दर वाढत असल्याचे ते म्हणाले. दीर्घ पल्ल्याच्या गुंतवणुकदारांसाठी सोन्याचे दर 50 हजार रुपयांच्या खाली गेल्यानंतर खरेदी योग्य राहील असे काही विश्लेषकांना वाटते.





