Tata Sierra EV : टाटा सिएरा ईव्ही भारतात लॉन्च; दमदार रेंज आणि ‘या’ आधुनिक फिचर्ससह बाजारात धुमाकूळ घालायला सज्ज!
Tata Sierra EV : भारतीय वाहन बाजारातील इलेक्ट्रिक वाहनांची वाढती मागणी लक्षात घेता, टाटा मोटर्सने आपली बहुप्रतिक्षित इलेक्ट्रिक एसयुव्ही 'टाटा सिएरा ईव्ही' अधिकृतपणे लॉन्च केली आहे.

Tata Sierra EV : भारतीय वाहन बाजारातील इलेक्ट्रिक वाहनांची वाढती मागणी लक्षात घेता, टाटा मोटर्सने आपली बहुप्रतिक्षित इलेक्ट्रिक एसयुव्ही ‘टाटा सिएरा ईव्ही’ अधिकृतपणे लॉन्च केली आहे. कंपनीच्या ईव्ही पोर्टफोलिओमधील हे सातवे वाहन असून, अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेली ही कार हॅरियर ईव्हीच्या खाली स्थानबद्ध असेल.
टाटा सिएरा ईव्हीची बेस व्हेरिएट किंमत १८.७९ लाख रुपये (एक्स-शोरूम) असून, टॉप-स्पेक व्हेरियंटची किंमत २४.७९ लाख रुपयांपर्यंत जाते. या कारचे बुकिंग १ जुलैपासून सुरू झाले असून, १५ जुलैपासून ग्राहकांना डिलिव्हरी मिळण्यास सुरुवात होईल. विशेष म्हणजे, खरेदीदारांना दिल्ली सरकारच्या नवीन ईव्ही धोरणाचा अतिरिक्त फायदा मिळणार आहे.
ही एसयूव्ही ६३ kWh आणि ७५ kWh अशा दोन बॅटरी पॅक पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. ७५ kWh बॅटरी पॅक सिंगल चार्जवर ६६५ किमीची रेंज देते. ड्युअल इलेक्ट्रिक मोटर्ससह क्वाड व्हील ड्राईव्ह प्रणाली असलेली ही कार केवळ ५.८ सेकंदात ० ते १०० किमी/तास वेग गाठू शकते आणि ५०४ एनएमचा टॉर्क निर्माण करते. १२० किलोवॅट फास्ट चार्जरद्वारे अवघ्या १५ मिनिटांत ही कार २५० किमीपेक्षा जास्त धावू शकते. कंपनी यासोबत ‘आजीवन बॅटरी वॉरंटी’ देखील देत आहे.
चालकाशिवाय पार्किंग – (Tata Sierra EV)

Tata Sierra EV : टाटा सिएरा ईव्ही भारतात लॉन्च; दमदार रेंज आणि ‘या’ आधुनिक फिचर्ससह बाजारात धुमाकूळ घालायला सज्ज!
या कारमध्ये ‘ई-व्हॅलेट’ आणि ‘समन मोड’ सारखी पार्किंग वैशिष्ट्ये आहेत, ज्यामुळे कार चालकाशिवाय पार्किंग लॉटमधून स्वतःहून दारापर्यंत येऊ शकते. डॅशबोर्डवर ट्रिपल-स्क्रीन सेटअप (१०.२५ इंच डिजिटल क्लस्टर, १२.३ इंच इन्फोटेनमेंट आणि १२.३ इंच पॅसेंजर डिस्प्ले) देण्यात आला आहे. सुरक्षेसाठी यात लेव्हल-२ अडास (एडीएएस), ६ एअरबॅग्ज आणि ५४०-डिग्री कॅमेरा आहे. बाजारात तिची थेट स्पर्धा ह्युंदाई क्रेटा ईव्ही आणि मारुती सुझुकी ई-विटाराशी असेल.

