सुशांत सिंह मृत्यू प्रकरणाबाबत पोलीस आयुक्त सिंग यांची महत्वाची माहिती; म्हणाले, CBI…

मुंबई – अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआयमार्फत केला जात आहे. सीबीआयचे अधिकारी लवकरच या प्रकरणाच्या अंतिम टप्प्यापर्यंत पोहोचतील. या प्रकरणाचा जो निष्कर्ष सीबीआयकडून काढला जाईल तो निष्कर्ष आमच्या तपासाशी मिळताजुळताच असेल.

सर्वोच्च न्यायालयानेदेखील आम्ही केलेल्या तपासाला अतिशय प्रोफेशनल तपास असे म्हटले होते. त्यामुळे सीबीआय या प्रकरणाचा जो निष्कर्ष काढेल तो आमच्या निष्कर्षासारखाच असेल, असा विश्वास पोलीस आयुक्त परमबीरसिंग यांनी व्यक्त केला.

30 डिसेंबरला सुशांत मृत्यू प्रकरणाच्या तपासाबाबत सीबीआयकडून माहिती देण्यात आली होती. सीबीआय अधिक व्यापक आणि तंत्रशुद्ध पद्धतीने तपास करत आहे. या प्रकरणातील वैज्ञानिक बाबीदेखील तपासल्या जात आहेत. तपासादरम्यान कोणताही विविध कंगोरे तपासले जात असून कोणतीही बाब दुर्लक्षित केली जात नाही, अशी माहिती सीबीआयकडून देण्यात आली होती.

दरम्यान, बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यूच्या घटनेला जवळपास सहा महिने झाले आहेत. या प्रकरणात अद्यापही नक्की काय घडले याचे कोडे उलगडलेले नाही. सुरूवातीच्या काळात मुंबई पोलीस सुशांत मृत्यू प्रकरणाचा तपास करत होते.

त्यानंतर हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात आले. सीबीआयच्या तपासातून अनेकविध पैलू समोर आले पण अद्याप सुशांतच्या बाबतीत नक्की काय घडले? याचे उत्तर सीबीआयने दिलेले नाही.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.