सातारा – जिल्ह्यात काल (दि. 12) रात्री जाहीर करण्यात आलेल्या अहवालांनुसार 88 नागरिकांना करोनाची बाधा झाली असून गेल्या 24 तासांमध्ये एका करोनाबाधिताचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी रविवारी दिली.
चाचण्यांच्या तुलनेत बाधितांचे प्रमाण अवघे सव्वाचार टक्के झाले असून करोनाबळीही घटल्याने जिल्हावासीयांना मोठा दिलासा मिळाला आहे; परंतु त्यामुळे बेसावध राहून चालणार नाही. नागरिकांनी पूर्वीप्रमाणेच आपल्या आरोग्याची काळजी घेताना सरकारी नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.
सातारा तालुक्यामध्ये सातारा शहरात यादोगोपाळ पेठ, सदरबझार प्रत्येकी एक, इतरत्र दोन, शिवथर दोन, शाहूपुरी, करंजे, सैदापूर, गेंडामाळ, तामजाईनगर, दौलतनगर, यशवंत कॉलनी, वाढे फाटा, देगाव प्रत्येकी एक, कराड तालुक्यामध्ये मसूर, आगाशिवनगर प्रत्येकी तीन, कराड शहर, गजानन हौसिंग सोसायटी प्रत्येकी दोन, ढेबेवाडी फाटा, केसे, उंडाळे, येणपे प्रत्येकी एक, फलटण तालुक्यामध्ये फलटण शहरात मंगळवार पेठ, स्वामी विवेकानंदनगर, जिंती नाका प्रत्येकी एक, इतरत्र एक, मुरुम सहा, कोळकी दोन, साठे फाटा, जाधववाडी, दुधेबावी, रहाटणी, तरडगाव, खराडेवाडी प्रत्येकी एक, वाई तालुक्यात आसले एक, खटाव तालुक्यात पुसेगाव दोन, खातगुण एक, माण तालुक्यात मलवडी चार, म्हसवड दोन, रांजणी, काळचौंडी, बंगेवाडी, गावठाण देवापूर, गोंदवले खुर्द प्रत्येकी एक, कोरेगाव तालुक्यातील कोरेगाव तीन, शिरढोण, वाठार किरोली, पाडळी, तळीये प्रत्येकी एक, पाटण तालुक्यातील उंडावणे एक, जावळी तालुक्यातील कुडाळ तीन, करंडी, म्हसवे प्रत्येकी दोन, महाबळेश्वर तालुक्यात माचुतर तीन, महाबळेश्वर एक, खंडाळा तालुक्यातील लोणंद, शिरवळ प्रत्येकी दोन, बाहेरील जिल्ह्यांमधील मुंबई, सांगली प्रत्येकी एक, असे एकूण 88 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील बाधितांची एकूण संख्या 53 हजार 491 झाली आहे.
दरम्यान, जिल्ह्यातील खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना बिदाल, ता. माण येथील 70 वर्षीय पुरुषा करोनामुळे मृत्यू झाला. आतापर्यंत जिल्ह्यातील करोनाबळींची संख्या 1768 झाली आहे. उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या 1547 आहे.