Rohit Pawar Protest : ‘शेतकऱ्यांना न्याय मिळाल्याशिवाय हटणार नाही’; रोहित पवारांचे पंढरपुरात बेमुदत अन्नत्याग आंदोलन
Rohit Pawar Protest : राज्यातील शेतकऱ्यांना विनाअट सरसकट कर्जमाफी मिळावी आणि सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीतील जाचक अटी तात्काळ रद्द कराव्यात, या प्रमुख मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी शुक्रवारी पंढरपुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील 'शिवतीर्थ' येथे बेमुदत अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात केली.

Rohit Pawar Protest : राज्यातील शेतकऱ्यांना विनाअट सरसकट कर्जमाफी मिळावी आणि सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीतील जाचक अटी तात्काळ रद्द कराव्यात, या प्रमुख मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी शुक्रवारी पंढरपुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील ‘शिवतीर्थ’ येथे बेमुदत अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात केली. (Rohit Pawar Protest)
शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य झाल्याशिवाय माघार घेणार नसल्याचा इशाराही त्यांनी सरकारला दिला.
आंदोलनापूर्वी पंढरपूर पोलिसांनी वाहतूक आणि कायदा-सुव्यवस्थेच्या कारणास्तव रोहित पवार यांना नोटीस बजावत पर्यायी जागेचा प्रस्ताव दिला होता. मात्र, “शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी निवडलेले आंदोलनस्थळ बदलणार नाही,” अशी ठाम भूमिका घेत त्यांनी नियोजित ठिकाणीच आंदोलन सुरू केले. त्यामुळे परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला. (Rohit Pawar Protest)
अन्नत्याग आंदोलनास प्रारंभ – (Rohit Pawar Protest )
आंदोलनाची सुरुवात श्री संत गाडगे बाबा मठ (स्टेशन रोड) येथून करण्यात आली. त्यानंतर राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारक आणि छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाला अभिवादन करण्यात आले. चौफाळा-पश्चिम द्वार मार्गे नामदेव पायरी येथे विठ्ठलाचे दर्शन घेतल्यानंतर मंदिर परिक्रमा पूर्ण करून आंदोलक ‘शिवतीर्थ’ येथे दाखल झाले आणि अन्नत्याग आंदोलनास प्रारंभ झाला.
सरकारवर हुकूमशाहीचा आरोप – (Rohit Pawar Protest )
आंदोलनादरम्यान रोहित पवार यांनी सरकारवर हुकूमशाहीचा आरोप करत सोशल मीडियावरील पोस्टमध्ये म्हटले की, “विठुरायाची पंढरी सर्व भक्तांसाठी खुली असताना सरकार बॅरिकेड्स उभारून अडथळे निर्माण करत आहे. मात्र, संविधानाने दिलेल्या आंदोलनाच्या अधिकाराच्या बळावर अन्नदात्यासाठीचा हा लढा कोणत्याही परिस्थितीत थांबणार नाही.”
पुढे त्यांनी, “सत्तेचा अहंकार जनतेच्या ताकदीसमोर टिकत नाही. सरकारच्या दबावामुळे प्रशासनाकडून अडथळे निर्माण केले जात असले तरी मनाने प्रशासनातील अनेकजण आमच्यासोबत आहेत,” असा दावा केला.
अटी-शर्तींमुळे शेतकरी संघटनांमध्ये तीव्र नाराजी – (Rohit Pawar Protest)
दरम्यान, राज्य सरकारने नुकतीच ३५ हजार कोटी रुपयांच्या कर्जमाफीची घोषणा केली असली तरी त्यातील विविध अटी-शर्तींमुळे शेतकरी संघटनांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. गुरुवारी (११ जून) मंचर येथे विविध शेतकरी संघटनांनी एकत्र येत या कर्जमाफीच्या शासन निर्णयाची (जीआर) प्रतीकात्मक होळी करून निषेध नोंदवला होता.
अन्नत्याग आंदोलनापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून तसेच नामदेव पायरीवर माथा टेकून आशीर्वाद घेतल्याचे सांगत, “अन्नदात्याच्या न्यायासाठीचा हा लढा अधिक ताकदीने सुरू राहील,” असा निर्धारही रोहित पवार यांनी व्यक्त केला.





