PNG Jewellers: देशातील घराघरांत साठवून ठेवलेले निष्क्रिय सोने पुन्हा अर्थचक्रात आणण्यासाठी आणि सोन्याच्या आयातीवरील भारताचे अवलंबित्व कमी करण्याच्या उद्देशाने पीएनजी ज्वेलर्स ने ‘स्वर्ण स्वराज’ या राष्ट्रहिताच्या उपक्रमाची घोषणा केली आहे. जबाबदार पद्धतीने सोन्याचा वापर आणि खरेदी करण्यास प्रोत्साहन देणे, हा या उपक्रमाचा मुख्य हेतू असल्याची माहिती कंपनीने दिली. १८३२ साली स्थापन झालेल्या पीएनजी ज्वेलर्सचे अध्यक्ष डाॅ. सौरभ गाडगीळ (Dr. Saurabh Gadgil) यांनी सांगितले की, “भारतामधील सोने भारतातच प्रवाही राहणे ही केवळ आर्थिक गरज नसून देशासाठी एकत्रितपणे उचलता येणारे प्रभावी पाऊल आहे.” जुने सोने एक्सचेंजसाठी विशेष केंद्र – या उपक्रमांतर्गत पीएनजी ज्वेलर्सकडून सर्व शोरूम्स आणि फ्रँचायझी स्टोअर्समध्ये विशेष ‘गोल्ड रिसर्क्युलेशन काउंटर’ सुरू करण्यात येणार आहेत. जुने सोने एक्सचेंज करणाऱ्या ग्राहकांना ‘स्वर्ण स्वराज सर्टिफिकेट’ देऊन त्यांच्या योगदानाचा गौरव केला जाणार आहे. कमी कॅरेटच्या दागिन्यांवर भर – कंपनीने १८ कॅरेट दागिन्यांच्या कलेक्शनचा विस्तार करण्याचा निर्णय घेतला असून ग्राहकांमध्ये कमी कॅरेटच्या सोन्याबाबत सकारात्मक संवाद निर्माण करण्यावर भर दिला जाणार आहे. तसेच आधुनिक डिझाईन्स असलेले १४ कॅरेट आणि ९ कॅरेटचे हलक्या वजनाचे दागिने ‘लाइटस्टाइल बाय पीएनजी’ या ब्रँडअंतर्गत अधिक प्रमाणात उपलब्ध करून दिले जाणार आहेत. जनजागृतीसाठी राज्यभर संवाद सत्रे – ‘स्वर्ण स्वराज’ मोहिमेअंतर्गत सहकारी गृहनिर्माण संस्था, गणेश मंडळे, महिला मंडळे आणि स्वयं-सहाय्यता गटांच्या माध्यमातून महाराष्ट्रासह देशभरात जनजागृती आणि संवाद सत्रांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे कंपनीने स्पष्ट केले. धोरणात्मक सुधारणांसाठी पुढाकार – देशांतर्गत सोन्याच्या पुनर्प्रवाह आणि पुनर्वापराला चालना देण्यासाठी उद्योग संघटना तसेच धोरणकर्त्यांशी सकारात्मक संवाद साधण्याची भूमिकाही कंपनीकडून घेण्यात येणार आहे.