प्रभात ऑनलाइन – जगभरातील बहुतांश लोक अनियमित जीवनशैलीमुळे विविध शारीरिक समस्यांशी झगडत आहेत. परंतु पाकिस्तानच्या हुंजा खोऱ्यातील हुंजा समुदायाची माणसे चक्क शंभरी पार करीत जगतात. ते शारीरिकदृष्ट्या बळकट आहेत आणि त्यांना रुग्णालयात जाण्याची फारशी गरज नाही.
सर्वात आश्चर्यकारक गोष्ट अशी आहे की इथल्या लोकांचे सरासरी आयुष्य सुमारे 120 वर्षे मानले जाते. या समुदायाच्या अनोख्या दिनचर्येंवर आणि जीवन जगण्याच्या पद्धतीवर बरीच पुस्तके लिहिली गेली आहेत.
एका अहवालानुसार, या समाजातील स्त्रिया 60 ते 90 वर्षांच्या वयात अगदी कोणत्याही अडचणींशिवाय गर्भवती होऊ शकतात. एवढेच नव्हे तर या समुदायाच्या स्त्रिया जगातील सर्वात सुंदर मानल्या जातात. हुंजा समाजातील लोकांना बुरुशो देखील म्हणतात. ते बुरुशास्की भाषा बोलतात.
असे म्हणतात की, हुंजा समुदायाचे लोक पाकिस्तानमधील इतर समाजांतील लोकांपेक्षा अधिक शिक्षित आहेत. हुंजा खोऱ्यात त्यांची संख्या 85 हजाराहून अधिक आहे. हा समुदाय मुस्लिम धर्मावर विश्वास ठेवतो आणि त्यांचे सर्व रूढी-परंपरा मुस्लिमांसारखेच आहेत.
हुंजा खोरे हे पाकिस्तानच्या प्रसिद्ध पर्यटनस्थळांपैकी एक आहे. जगभरातील लोक पर्वतांचे सौंदर्य पाहण्यासाठी येथे येतात. या समुदायावर ‘द हेल्दी हुंजाज’ आणि ‘द लॉस्ट किंगडम ऑफ हिमालय’ यासह अनेक पुस्तके लिहिली गेली आहेत.
हुंजा समाजातील लोकांची अनोखी जीवनशैली हे त्यांच्या दीर्घ आयुष्याचे रहस्य आहे. हे लोक पहाटे पाच वाजता उठतात. इथले लोक सायकली किंवा वाहने क्वचितच वापरतात आणि पायी जाण्यासाठी जास्त चालतात.
या समुदायाचे लोक सहसा केवळ ज्वारी, बाजरी, बार्ली आणि गव्हाचे पीठ खात असतात, ज्यामुळे त्यांना शारीरिकदृष्ट्या बळकट करण्यात मदत होते. असे म्हणतात की हे लोक मांस फारच क्वचितच खातात. मांस येथे केवळ एका विशिष्ट प्रसंगी तयार केले जाते, परंतु त्यावेळीही हे लोक अगदी प्रमाणातच मांस खातात.