प्रभात प्रभाव : प्रभातच्या वृत्तानंतर उपजिल्हाधिकाऱ्यांचा पाहणी दौरा; शेतकऱ्यांना मदतीचं आश्वासन

Updated On:

केंदुर – गेल्या आठवड्यात केंदूर भागासह संपुर्ण शिरूर तालुक्यात जोरदार पाऊस झाला. ओढे-नाले, बंधारे, रस्ते फुटून वाहून गेले, त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले. या सर्व परिस्थितीचे वृत्त प्रभातने प्रसारीत केल्यानंतर झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी आज केंदूर, करंदी, पाबळ परिसरात उपजिल्हाधिकारी संतोष कुमार देशमुख यांनी पाहणी दौरा केला.

यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना दिलासा देत नुकसान झालेल्या प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन पंचनामा केला जाईल. त्याचबरोबर हा संपूर्ण अहवाल शासनाकडे पाठवला जाईल आणि शासनान देणार असलेली मदत प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचवली जाईल. यातून एकही शेतकरी वंचित राहणार नाही याची आम्ही खबरदारी घेणार आहोत, असे मत यावेळी उपजिल्हाधिकारी संतोषकुमार देशमुख यांनी व्यक्त केले.

करंदी आणि केंदूर परिसरामध्ये गेल्या आठवड्यात झालेल्या पावसामुळे करंदीच्या उत्तर भागात असलेल्या चार पैकी तीन नाले फुटून शेतकर्‍यांच्या शेतात पाणी गेले आहे. त्याचबरोबर वेळ नदीला पुर आल्याने बंधारा फुटला आणि बंधाऱ्याचे दरवाजे वाहून गेले आहे. पऱ्हाडवाडी आणि केंदुरच्या इतर भागात देखील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन झालेल्या नुकसानीची देशमुख यांनी पाहणी केली.

यावेळी त्यांनी झालेल्या नुकसानीचा संपूर्ण आढावा घेतला. शेतकऱ्यांशी संवाद साधला त्याचबरोबर ज्या ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले त्या सर्व शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पंचनामा करण्याच्या सूचना स्थानिक तलाठी व कृषी अधिकारी यांना दिल्या.

या दौऱ्यामध्ये त्यांच्यासमवेत पंचायत समितीच्या उपसभापती सविता पऱ्हाड, विठ्ठल पऱ्हाड, सुरेश उंद्रे, काळूराम दरेकर, मदन पऱ्हाड, सतीश पऱ्हाड, संतोष ढोकले, प्रवीण झेंडे, बाप्पू दरेकर, संजय पऱ्हाड आदी शेतकरी उपस्थित होते.

आणखी संबंधित बातम्या

Maharashtra Rain : महाराष्ट्रातून मान्सूनचीही एक्झिट; संपूर्ण हंगामात १९ टक्के इतकी पावसाची तूट

2026-10-08 18:32:17

Maharashtra Rain : महाराष्ट्रातून मान्सूनचीही एक्झिट; संपूर्ण हंगामात १९ टक्के इतकी पावसाची तूट

Vadgaon Maval : भातपिकांना पावसाची प्रतीक्षा; पावसाच्या दडीने ग्रामीण अर्थचक्राला ब्रेक

2026-10-07 08:06:40

Vadgaon Maval : भातपिकांना पावसाची प्रतीक्षा; पावसाच्या दडीने ग्रामीण अर्थचक्राला ब्रेक

Sunetra Pawar: 'दुष्काळसदृश परिस्थितीचे संकट दूर व्हावं'; श्री मयुरेश्वराच्या चरणी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे साकडं

2026-10-05 12:29:01

Sunetra Pawar: 'दुष्काळसदृश परिस्थितीचे संकट दूर व्हावं'; श्री मयुरेश्वराच्या चरणी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे साकडं

Jamkhed News: वाघा गावात करडई आद्यरेषीय प्रात्यक्षिकासाठी सुधारित बियाणे वाटप

2026-10-05 12:15:45

Jamkhed News: वाघा गावात करडई आद्यरेषीय प्रात्यक्षिकासाठी सुधारित बियाणे वाटप

TOP 15 News: काँग्रेसकडून उमेदवारांची यादी जाहीर ते कॅप्टन स्मितशी मोदींचा संवाद; संकटात हनुमानाची प्रार्थना, जाणून घ्या TOP 15 News

2026-10-03 10:04:18

TOP 15 News: काँग्रेसकडून उमेदवारांची यादी जाहीर ते कॅप्टन स्मितशी मोदींचा संवाद; संकटात हनुमानाची प्रार्थना, जाणून घ्या TOP 15 News