मुंबई – राजस्थान रॉयल्सचा कर्णधार अजिंक्य रहाणे आणि मुंबई इंडियन्सचा कर्णधारा रोहित शर्मायांना षटकांची गती राखण्यात कसूर केल्या बद्दल प्रत्येकी 12 लाख रुपयांचा दंड केला गेला आहे.
मुंबईने किंग्ज इलेव्हन पंजाब विरुद्ध झालेल्या सामन्यात पराभव पत्करला होता तर राजस्थान रॉयल्स संघाला चेन्नई सुपर किंग्ज संघाकडून पराभवाची चव चाखावी लागली होती. या दोन्ही सामन्यात राजस्थान आणि मुंबईच्या संघाला षटकांची गती राखता आली नसल्याने हा दंड केला गेला.