नवी दिल्ली – देशातील कोविडची दैनंदिन रुग्णांची संख्या आता एक लाखाच्या आत आली आहे. गेल्या 24 तासांत देशात 86 हजार 498 करोना रुग्ण आढळून आले असून, ही गेल्या 64 दिवसांतील सर्वात नीचांकी संख्या आहे.
तथापि, असे असले तरी मृतांचा दैनंदिन आकडा मात्र अजून दोन हजारांच्या आत यायला तयार नाही. गेल्या 24 तासांत देशात एकूण 2123 रुग्ण दगावले आहेत. यामुळे देशातील एकूण कोविड बळींची संख्या 3 लाख 51 हजार 309 इतकी झाली आहे.
देशातील सक्रिय बाधितांची संख्या आणखी घटली असून, ही संख्या आता 13 लाख 3 हजार 702 इतकी झाली आहे. गेल्या 24 तासांत 1 लाख 82 हजार 282 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.