इंदापूर : वसुंधरेला साथ देण्यासाठी नगराध्यक्षांसह अधिकारी, नागरिकांनी घेतली अनोखी ‘शपथ’

Updated On:

– नीलकंठ मोहिते

रेडा –  इंदापूर नगरपरिषद स्वच्छ व सुंदर कायम ठेवण्यासाठी नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा अंकिताताई शहा यांनी यशस्वी प्रयत्न केला आहे. तर आज वसुंधरेला भक्कम कम साथ देण्यासाठी, नगराध्यक्षांसह अधिकारी नागरिकांनी अनोखी शपथ घेतली आहे.

इंदापूर शहरातील घराघरातील नागरिकांनी, आपल्या वसुंधरेला भक्कम साथ देण्यासाठी, मोकळ्या जागेत वृक्षारोपण करून पर्यावरणाचा समतोल राखावा व ऊर्जा बचत करण्यासाठी सौर ऊर्जेचा वापर करावा. तरच वसुंधरेला आपण भक्कम साथ देतोय हे सिद्ध होईल, असे आवाहन इंदापूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा अंकिताताई मुकुंद शहा यांनी केले.

इंदापूर नगर परिषदेच्या वतीने वसुंधरा अभियानांतर्गत नगरपरिषदेच्या कार्यालयासमोरील प्रंगणामध्ये सायकल विक्री स्टॉल, वृक्ष विक्री स्टॉल, सौर ऊर्जा दिवा विक्री स्टॉल व सोलर पॅनल विक्री स्टॉल, उभारण्यात आले होते. या स्टॉल चे इंदापूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा अंकिताताई मुकुंद शहा यांच्या हस्ते उद्घाटन करून विक्रीचा प्रारंभ करण्यात आला.

यावेळी इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे मुख्य सचिव मुकुंद शहा, सामाजिक कार्यकर्ते हमीदभाई आतार, प्रशासकीय अधिकारी वर्षा क्षिरसागर, अलताब पठाण, आरोग्य निरीक्षक मनोज बारटक्के, गोरक्षनाथ वायाल, सहाय्यक आरोग्य निरीक्षक लीलाचंद पोळ, सुनील लोहिरे व इंदापूर नगरपालिकेचे कर्मचारी अधिकारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पुढे मार्गदर्शन करताना नगराध्यक्षा अंकिताताई शहा म्हणाल्या की, नागरिकांमध्ये अग्नी, वायू, जल, ऊर्जा व  आकाश या पंचतत्त्वांची जनजागृती होऊन वसुंधरेला प्रदूषण मुक्त करण्यासाठी, ऊर्जा बचत करणेसाठी सौर ऊर्जेचा वापर करणे नितांत गरज आहे. मोटर्स गाड्या मुळे होणारे प्रदूषण टाळण्यासाठी सायकलचा वापर करणे, या वसुंधरेला हिरवाईने नटवण्यासाठी वृक्षारोपण करण्यासाठी त्यापासून मिळणाऱ्या फायद्यांसाठी नागरिकांनी एक तरी झाड लावावे, असेही आवाहन नगराध्यक्षा अंकिताताई शहा यांनी केले.

यावेळी उपस्थित नागरिकांना माझी वसुंधरा ची शपथ श्रद्धा वळवडे यांनी दिली. त्यानंतर सर्व स्टॉल मालकांचा नगराध्यक्षा अंकिताताई शहा यांच्या हस्ते गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला. सोलर वॉटरहीटर साठी विश्व एजन्सिज प्रोप्रायटर शैलेश घोरपडे यांनी स्टॉल उभा केला होता. वृक्ष विक्रीसाठी देशपांडे नर्सरीचे उदय देशपांडे यांनी स्टॉल उभा केला होता.

सोलर एलईडी लाईट विक्रीसाठी दिनकर गायकवाड यांनी स्टॉल उभा केला होता. तसेच सायकल विक्री साठी सोनल सायकल मॉल चे शिंदे यांनी विक्रीसाठी अद्यावत स्टॉल निर्माण केला होता. नगर परिषदेच्या वतीने या सर्व मित्रांचे स्वागत सन्मान करण्यात आला. आभार प्रशासकीय अधिकारी वर्षा शिरसागर यांनी मानले.

आणखी संबंधित बातम्या

Indapur News: लोकशाहीरांचे साहित्य म्हणजे सामाजिक परिवर्तनाची प्रेरणागाथा; नगराध्यक्ष भरत शहा यांचे प्रतिपादन

2026-08-02 04:15:11

Indapur News: लोकशाहीरांचे साहित्य म्हणजे सामाजिक परिवर्तनाची प्रेरणागाथा; नगराध्यक्ष भरत शहा यांचे प्रतिपादन

Indapur News: इंदापूरकरांसाठी खूशखबर! शहराच्या विकासासाठी २.७४ कोटींचा निधी मंजूर; पाहा काय बदल घडणार?

2026-08-01 03:15:46

Indapur News: इंदापूरकरांसाठी खूशखबर! शहराच्या विकासासाठी २.७४ कोटींचा निधी मंजूर; पाहा काय बदल घडणार?

Indapur News: इंदापूरचा 'एसआयआर पॅटर्न' राज्यासाठी आदर्श! मतदारांपर्यंत पोचण्यासाठी नगराध्यक्ष भरत शहा मैदानात

2026-07-13 04:45:02

Indapur News: इंदापूरचा 'एसआयआर पॅटर्न' राज्यासाठी आदर्श! मतदारांपर्यंत पोचण्यासाठी नगराध्यक्ष भरत शहा मैदानात

Indapur News : इंदापूर नगरपरिषदेत खळबळ! 'त्या' नामनिर्देशित सदस्याच्या धमकीनंतर कर्मचाऱ्यांची पोलिसांत धाव

2026-06-05 03:46:12

Indapur News : इंदापूर नगरपरिषदेत खळबळ! 'त्या' नामनिर्देशित सदस्याच्या धमकीनंतर कर्मचाऱ्यांची पोलिसांत धाव

Indapur News : इंदापूर नगरपरिषदेचा महिलांसाठी खास उपक्रम; शहरातील हजारो महिलांचा सहभाग..वाचा सविस्तर

2026-03-12 03:45:18

Indapur News : इंदापूर नगरपरिषदेचा महिलांसाठी खास उपक्रम; शहरातील हजारो महिलांचा सहभाग..वाचा सविस्तर