Silver Rates : चांदीचे दर कोसळले; जाणून घ्या आजचा दर
Updated On:

नवी दिल्ली – जागतिक बाजारात मंगळवारी सोन्याच्या दरात घट झाली. त्या प्रमाणात भारतीय बाजारातही सोन्याचे दर कमी झाले. दिल्ली सराफात सोन्याचा दर 54 रुपयांनी कमी होऊन 45,080 रुपये प्रति दहा ग्रॅम झाला. तर तयार चांदीचा दर तब्बल 573 रुपयांनी कोसळून 58,961 रुपये प्रती किलो या पातळीवर गेला.
जागतीक बाजारात सोन्याचा दर 1,743 डॉलर तर चांदीचा दर 22.37 डॉलर पातळीवर गेला. सोन्याचे दर घसरत असल्याबद्दल एचडीएफसी सिक्युरिटीचे वरिष्ठ विश्लेषक तपन पटेल यांनी सांगितले की, डॉलर वधारत असल्यामुळे सोन्याच्या दरात घट होत आहे.
त्यातच अमेरिकेच्या कर्ज रोख्यावरील परतावा वाढू लागल्यामुळे सोन्याच्या दरामध्ये आणखी घट नोंदली जात आहे. अमेरिका लवकरच भांडवल सुलभता कमी करून व्याजदर वाढविण्याची शक्यता असल्यामुळे सोन्यातून गुंतवणूक इतरत्र जात असल्याचे दिसून येत आहे.





