लंडन – कोरोनाच्या वाढत्या धोक्यामुळे इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट मंडळावर दिवाळखोरीचे संकट निर्माण झाले आह. सर्व स्पर्धा रद्द झाल्याने उत्पन्नाचे कोणतेही साधन नसल्याने मंडळाने करारबद्ध क्रिकेटपटूंच्या पगारात कपात करण्याचा प्रस्ताव ठेवला होता त्याला सर्व क्रिकेटपटूंनी तयारी दर्शविली आहे.
करोनामुळे अन्य देशांप्रमाणे इंग्लंडमध्येही लॉकडाऊन झाले आहे. केवळ क्रिकेटच नव्हे तर अन्य कर्व क्रीडा स्पर्धा रद्द करण्यात आल्या आहेत. इतकेच नव्हे तर, इंग्लंडमधील पारंपरिक कौंटी क्रिकेटही थांबले आहे. त्यामुळे मंडळाला मिळणारे उत्पन्न देखील थांबले आहे. त्यामुळे मंडळाने करारबद्ध असलेल्या पुरुष व महिला संघाच्या खेळाडूंसमोर पगार कपातीचा प्रस्ताव ठेवला होता. सर्व क्रिकेटपटूंनी या कपातीस पाठिंबा दिला असून भविष्यात आणखीही मदत लागली तर वैयक्तिक पातळीवर पुढे येणार असल्याची ग्वाही देखील मंडळाला दिली आहे.
मंडळाने करारबद्ध खेळाडूंच्या पगारात 20 टक्के कपात करण्याचा प्रस्ताव ठेवला होता. या प्रस्तावाला मान्यता दिल्यानंतर खेळाडूंनी एकत्र मदत देताना करोनाग्रस्तांच्या मदतीसाठी आणखी 5 लाख पाऊंड देणार आहेत.
एजबस्टन बनले विलगीकरण कक्ष
देशातील करोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी रुग्णालये देखील कमी पडत असल्याने वॉर्विकशायर कौंटी क्रिकेट क्लबने त्यांच्या मालकिचे जगप्रसिद्ध एजबस्टन क्रिकेट मैदान या रुग्णांसाठी उपलब्ध करून दिले आहे.