-->

शिवसेना-कॉंग्रेसमध्ये नामांतरावरुन “नुरा कुस्ती’ – फडणवीस

नागपूर – औरंगाबाद शहराच्या नामांतरावरुन शिवसेना आणि कॉंग्रेस यांच्यात नुरा कुस्ती सुरु आहे, असा टोला विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे. नागपूर येथे पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही टीका केली आहे.

फडणवीस म्हणाले, औरंगाबाद महापालिकेची निवडणूक जवळ आली आहे म्हणून शिवसेनेला हा मुद्दा आठवतो आहे. त्यामुळेच शिवसेनेने पुन्हा एकदा नामांतराचा विषय समोर आणला आहे. महानगरपालिकेची निवडणूक झाली की शिवसेनेला या मुद्द्याचा विसर पडेल.

कॉंग्रेसने औरंगाबादच्या संभाजीनगर या नामकरणाला विरोध केला काय किंवा नाही केला काय? शिवसेनेला हा मुद्दा फक्त निवडणुकीपुरता हवा असतो. या मुद्द्यावरुन शिवसेना आणि कॉंग्रेस यांच्यात नुरा कुस्ती सुरु आहे, असा टोला त्यांनी लगावला आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.