कोविडच्या ‘लसी’बाबत आशेचा ‘किरण’

जागतिक आरोग्य संघटनेचे अध्यक्ष ऍन्टोनिओ गुटरेज यांचा आशावाद

संयुक्‍त राष्ट्र – करोना प्रतिबंधासाठी जगभरात सुरू असलेल्या संशोधनामुळे या संदर्भात आशेचा किरण निर्माण झाला आहे. आता या लस उत्पादनाच्या कामाला गती देण्यासाठी सर्वांपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे आणि प्रामुख्याने “जी-20′ देशांनी या लस निर्मितीच्या कामाला सहकार्य करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन जागतिक आरोग्य संघटनेचे अध्यक्ष ऍन्टोनिओ गुटरेज यांनी केले आहे.

करोनावरील उपचारासाठी विकसित केल्या जात असलेल्या लसीला 95 टक्‍क्‍यांपेक्षा अधिक सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे, असे ही लस निर्माण करणाऱ्या फायझर आणि बायोएन्टेक या कंपन्यांनी याच आठवड्यात म्हटले आहे. त्यापूर्वी काही दिवस आगोदरच मॉडर्ना कंपनीने आपली लस 94.5 टक्के परिणामकारक असल्याचा दावा केला होता.

यामुळेच “आशेचा किरण’ निर्माण झाला आहे. मात्र आता सर्वांपर्यंत पोहोचणे आवश्‍यक आहे. तसेच या संशोधनाच्या कार्याला सहाय्यही करणे गरजेचे आहे, असे गुटरेज यांनी म्हटले आहे. ही लस सर्वसामान्यांना उपलब्ध होईल याची काळजी घेतली गेली पाहिजे. साथीला रोखण्याचा हा एकमेव उपाय असणार आहे, असेही ते म्हणाले.

जगभर सुरू असलेल्या लस संशोधन आणि विकासाच्या कामाच्या सध्याच्या पूर्वानुमानानुसार 2020 मध्येच करोनाविरोधी लसीचे 5 कोटी डोस उपलब्ध होतील. तर 2021 च्या अखेरीपर्यंत 1.3 अब्ज डोस उपलब्ध होतील. गेल्या सात महिन्यांत अनेक देशांनी लसीबाबतचे संशोधन, निदान आणि उपचारपद्धती विकसित करण्यासाठी 10 अब्ज डॉलरची गुंतवणूक केली आहे.

अजूनही 28 अब्ज डॉलरची आवश्‍यकता आहे. त्यातील 4.2 अब्ज डॉलर याच वर्षात उपलब्ध होणे आवश्‍यक आहे. त्यासाठी “जी-20′ देशांनी योगदान देणे गरजेचे आहे. ही लस सर्वसामान्यांना उपलब्ध करून देणे हेच आता महत्वाचे उद्दिष्ट असल्याचे गुटरेज म्हणाले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.