कॅनडाचे पीएम जस्टिन ट्रुडो सापडले अडचणीत; आणखी एक वाईट बातमी आली समोर

Canadian Prime Minister Justin Trudeau : दहशतवादी हरदीपसिंग निज्जरच्या (Hardeep Singh Nijjar) हत्येप्रकरणी भारताला जबाबदार धरल्याने कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो अडचणीत सापडले आहेत. आता त्यांना कॅनडाचे मित्र राष्ट्र ‘फाइव्ह आयज’ (अमेरिका, ब्रिटन, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया) (America, Britain, New Zealand and Australia) कडूनही या प्रकरणात पाठिंबा मिळत नाही. अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालय पेंटागॉनच्या (America’s Defense Ministry Pentagon) एका माजी अधिकाऱ्याने तर असेही म्हटले आहे की, ट्रूडो विचार न करता भारतावर आरोप करत आहेत आणि ते यात अडकले आहेत. ट्रूडो यांच्या सरकारमध्ये सर्व काही सुरळीत सुरू नाही. आज निवडणुका झाल्या तर त्यांचे सरकार पडेल, असे ताज्या सर्वेक्षणातून समोर आले आहे.
भारतावर आरोप करून ट्रुडो कसे अडचणीत?
18 जून 2023 रोजी खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंह निज्जरची कॅनडात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. 18 सप्टेंबर रोजी, हत्येच्या बरोबर तीन महिन्यांनंतर, कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी संसदेत निज्जरच्या हत्येचा आरोप भारतावर केला. तथापि, भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने ट्रुडोचे दावे निरर्थक आणि पक्षपाती असल्याचे म्हणत नाकारले आहेत. (India’s Ministry of External Affairs rejected Trudeau’s claims)
मात्र, आता कॅनडाचे पंतप्रधान जस्टिस ट्रूडो भारतावर आरोप केल्याने अडचणीत सापडले आहेत. जस्टिन ट्रुडो आपल्या आरोपांच्या समर्थनार्थ कोणताही पुरावा सादर करू शकलेले नाहीत, तर भारताने कॅनडाच्या आरोपांवर कठोर भूमिका घेतली आहे. दुसरीकडे, त्यांना कॅनडाचे मित्र राष्ट्र ‘फाइव्ह आयज’ (अमेरिका, ब्रिटन, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया) यांचेही समर्थन मिळत नाही.
निवडणुकांमुळे ट्रुडो भारतावर आरोप करत आहेत?
पेंटागॉनचे माजी अधिकारी आणि अमेरिकन एंटरप्रायझेस इन्स्टिट्यूटचे वरिष्ठ सहकारी, मायकेल रुबिन यांनी या वादावर सांगितले, ‘मला वाटत नाही की कॅनडाचे सहयोगी देश जस्टिन ट्रूडोंच्या सिद्धांताशी सहमत आहेत. जमाल खशोग्गी यांची इस्तंबूलमध्ये हत्या झाली तेव्हा तुर्कस्तानने अनेक महत्त्वाचे पुरावे दिले होते, त्यामुळे जगभरातून सौदी अरेबियावर टीका झाली होती. मात्र जस्टिन ट्रुडो विचार न करता भारतावर आरोप करत आहेत आणि ते आजपर्यंत कोणतेही पुरावे सादर करू शकलेले नाहीत. जेव्हा ट्रूडो म्हणतात की, त्यांच्यावर विश्वास ठेवा, कोणीही त्यांच्यावर विश्वास ठेवत नाही. हे सर्व निवडणूक प्रचारासाठी होत असून, त्यात ट्रुडो यांचा पराभव होताना दिसत आहे. यामुळेच अमेरिकेसह फाइव्ह आयज देश या मुद्द्यावर कॅनडाला पाठिंबा देत नाहीत.
ट्रुडो आपल्याच देशात घेरले गेले?
भारताला दोष देऊन ट्रुडो जगात एकटे पडले आहेत, तर कॅनडातही त्यांचा दर्जा घसरत आहे. अलीकडेच, कॅनेडियन वृत्तपत्र ग्लोबल न्यूज इप्सॉस नावाच्या एजन्सीने घेतलेल्या सर्वेक्षणातून असे दिसून आले आहे की, कॅनडाचे पंतप्रधान ट्रूडो यांची लोकप्रियता कमी होत आहे.
कॅनेडाचे 40 टक्के लोक विरोधी पक्षनेते पियरे पॉइलिव्हरे (कंझर्व्हेटिव्ह पार्टी) यांना पंतप्रधान म्हणून पाहू इच्छितात. तर केवळ 31 टक्के लोकांनी जस्टिन ट्रुडो (लिबरल पार्टी) यांना मतदान करणार असल्याचे सांगितले गेले आहे. पॉइलिव्हरे हे ट्रुडोपेक्षा वैयक्तिकरित्या अधिक लोकप्रिय आहेत. जर आता निवडणुका झाल्या, तर ट्रूडोंच्या नेतृत्वाखालील लिबरल सरकारची हकालपट्टी केली जाऊ शकते आणि कंझर्व्हेटिव्ह बहुमताचे सरकार स्थापन केले जाऊ शकते. कॅनडात 2025 च्या शेवटी निवडणुका होणार आहेत.
लोकांनी ट्रुडो यांना 55 वर्षांतील सर्वात वाईट पंतप्रधान म्हटले –
कॅनडामध्ये ट्रुडोंची लोकप्रियता कमी होत असल्याचे दाखवणारे हे एकमेव सर्वेक्षण नाही. याआधी ऑगस्टमध्ये अँगस रीड इन्स्टिट्यूट नावाच्या एनजीओने केलेल्या सर्वेक्षणात त्यांचा प्रतिस्पर्धी पियरे पॉइलीव्हरे आघाडीवर असल्याचे दिसून आले होते. सर्वेक्षणात असे म्हटले आहे की, 38 टक्के कॅनेडियन पोइलिएव्हरे यांच्या नेतृत्वाखालील कंझर्व्हेटिव्ह पक्षाच्या समर्थनात आहेत. त्याच वेळी, जुलैमध्ये केलेल्या सर्वेक्षणात 30 टक्के कॅनेडियन लोकांनी ट्रूडो यांना गेल्या 55 वर्षांतील सर्वात वाईट पंतप्रधान म्हणून संबोधले होते.





