“साज ह्यो तुझा’ गाण्यावर गोंधळी कलावंतांनी धरला ‘ठेका’; व्हिडीओ एकदा बघाच

Updated On:

पुणे – राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या ‘ख्वाडा’ चित्रपटाचे दिग्दर्शक भाऊ राव कऱ्हाडे यांनी 2018 मध्ये ‘बबन’  चित्रपट प्रेक्षकांसमोर आणला. बबन’(भाऊ साहेब शिंदे) आणि कोमल (गायत्री जाधव) यांची प्रेमकथा या चित्रपटात बघायला मिळाली होती.

ग्रामीण भागातील, शेतकरी कुटुंबातील महाविद्यालयीन युवकाची कथा या चित्रपटात दाखवण्यात आली.  वेगवेगळ्या धाटणीच्या गाण्यांमुळे बबन प्रेक्षकांच्या जास्तच पसंतीस उतरला होता.

चित्रपटातील ‘साज ह्यो तुझा’ गाणं पुन्हा एकदा चर्चेत आलंय. या गाण्यावर गोंधळी कलावंतांनी ठेका धारल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतोय. गीत लेखक सुहास मुंडे यांनी तो व्हिडीओ फेसबुकवर शेअर करून प्रतिक्रिया दिली आहे.

“आनंद लुटण्यासाठी अशा प्रकारे ठेका धरला जाईल ह्याचा विचार केला नव्हता. ज्यांच्यासाठी करतोय त्यांच्यापर्यंत काम पोहचतय, खोलवर मुरतय
कुठल्यातरी गावात लोक आपल गाणं असही enjoy करतात आनंद आहे,’ अशी प्रतिक्रिया सुहासने दिलीय.

मुळ गाणं ओंकार स्वरूप यांनी गायले असून गीत लेखन सुहास मुंडे यांनी केले आहे. या गाण्याला युट्यूबवर 45 मिलियनहून अधिक व्ह्यूज आहेत.

आणखी संबंधित बातम्या

Kedar Shinde : केदार शिंदेंचा नवा सिनेमा; 'आई भाड्यानं हवी?'मध्ये दिसणार 'या' अभिनेत्री

2026-10-14 12:49:10

Kedar Shinde : केदार शिंदेंचा नवा सिनेमा; 'आई भाड्यानं हवी?'मध्ये दिसणार 'या' अभिनेत्री

Sohla Movie Trailer : सोनाली बेंद्रेचे मराठी सिनेमात पदार्पण; चाहत्यांमध्ये उत्सुकता

2026-10-06 07:56:24

Sohla Movie Trailer : सोनाली बेंद्रेचे मराठी सिनेमात पदार्पण; चाहत्यांमध्ये उत्सुकता

Priyadarshini Indalkar: छाया कदम यांच्यासोबतचा फोटो शेअर करत प्रियदर्शिनीने व्यक्त केली भावना

2026-09-28 14:16:38

Priyadarshini Indalkar: छाया कदम यांच्यासोबतचा फोटो शेअर करत प्रियदर्शिनीने व्यक्त केली भावना

Marathi Film Gondhal : मराठी चित्रपट सृष्टीसाठी सर्वात मोठी बातमी; ऑस्कर 2027 साठी 33 चित्रपटांमधून ‘गोंधळ’ची भारताकडून अधिकृत निवड

2026-09-18 19:06:01

Marathi Film Gondhal : मराठी चित्रपट सृष्टीसाठी सर्वात मोठी बातमी; ऑस्कर 2027 साठी 33 चित्रपटांमधून ‘गोंधळ’ची भारताकडून अधिकृत निवड

Mahashakti Teaser: ‘महाशक्ती’ सिनेमाचा टीझर रिलीज; नयनतारा दिसणार शक्तिशाली देवी अवतार

2026-09-15 15:24:34

Mahashakti Teaser: ‘महाशक्ती’ सिनेमाचा टीझर रिलीज; नयनतारा दिसणार शक्तिशाली देवी अवतार