Same Sex Marriage: समलिंगी विवाहाबाबत SCच्या निर्णयावर असदुद्दीन ओवेसी म्हणाले, ‘माझी अंतरात्मा सांगते की लग्न फक्त…’

Asaduddin Owaisi On Same Sex Marriage: AIMIM चे प्रमुख आणि हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी समलैंगिक विवाहाबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर प्रतिक्रिया दिली आहे. ओवेसी यांनी आपले मत मांडले आहे. ओवेसी यांनी त्यांच्या अधिकृत X हॅडलवर पोस्ट केली की, सर्वोच्च न्यायालयाने संसदीय वर्चस्वाचे तत्त्व कायम ठेवले आहे. कोणत्या कायद्यानुसार कोणाशी लग्न करायचे हे न्यायालयावर अवलंबून नाही.
#SameSexMarriage
1. SC has upheld the principle of parliamentary supremacy. It is not up to the courts to decide who gets married under what law.
2. My faith and my conscience says that marriage is only between a man and a woman. This is not a question of decriminalisation like…— Asaduddin Owaisi (@asadowaisi) October 17, 2023
ते पुढे म्हणाले, “माझा विश्वास आणि माझी अतरात्मा सांगते की, विवाह हा फक्त स्त्री आणि पुरुष यांच्यात असतो. हा 377 च्या प्रकरणाप्रमाणे गुन्हेगारीकरणाचा प्रश्न नाही, तो विवाहाच्या मान्यतेचा आहे. सरकार कोणा एकावर किंवा सर्वांवर लादू शकत नाही हे खरे आहे.
असदुद्दीन ओवेसी यांनी पोस्टमध्ये लिहिले की, “मला खंडपीठाच्या टिप्पणीमुळे काळजी वाटते की ट्रान्सजेंडर लोक विशेष विवाह कायदा आणि वैयक्तिक कायद्यानुसार विवाह करू शकतात. जोपर्यंत इस्लामचा संबंध आहे, ती योग्य व्याख्या नाही कारण इस्लाम दोन जैविक पुरुष किंवा दोन जैविक मादी यांच्यातील विवाहाला मान्यता देत नाही.
“मी न्यायमूर्ती भट यांच्याशी सहमत आहे की विशेष विवाह कायद्याचे लिंग-तटस्थ व्याख्या काहीवेळा न्याय्य असू शकत नाही आणि परिणामी महिलांसाठी अनपेक्षित असुरक्षा निर्माण होऊ शकतात,” असेही ओवेसी यांनी म्हंटले आहे.





