नगर : गेल्या 24 तासात 134 नव्या बाधितांची भर; जाणून घ्या इतर आकडेवारी

नगर – जिल्ह्यात आज 181 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 66 हजार 562 इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता 97 टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (रविवारी) सायंकाळी सहा वाजलेपासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रुग्णसंख्येत 134 ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता 1 हजार 51 इतकी झाली आहे.
जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये 39, खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत 35 आणि अँटिजेन चाचणीत 60 रुग्ण बाधित आढळले. जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये बाधित आढळून आलेल्या रुग्णांमध्ये मनपा 14, अकोले 1, कर्जत 2, कोपरगाव 7, नगर ग्रामीण 4, नेवाके 2, पारनेर 2, पाथर्डी 2, राहता 4, राहुरी 1, अशा रुग्णांचा समावेश आहे.
खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णांमध्ये मनपा 14, अकोले 2, कर्जत 1, नगर ग्रामीण 1, नेवासे 1, पाथर्डी 1, राहाता 5, संगमनेर 5, श्रीरामपूर 2, इतर जिल्हा 3, अशा रुग्णांचा समावेश आहे.
अँटिजेन चाचणीत आज 60 जण बाधित आढळून आले. यामध्ये मनपा 5, जामखेड 3, कोपरगाव 6, नेवासे 5, राहाता 5, राहुरी 1, संगमनेर 24, शेवगाव 3, श्रीगोंदा 3, श्रीरामपूर 4, कॅन्टोन्मेंट बोर्ड 1, अशा रुग्णांचा समावेश आहे.
दरम्यान, आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णांमध्ये मनपा 32, अकोले 11, कर्जत 1, कोपरगाव 8, नगर ग्रामीण 9, नेवासे 15, पारनेर 14, पाथर्डी 4, राहाता 16, राहुरी 3, संगमनेर 47, शेवगाव 7, श्रीगोंदा 1, श्रीरामपूर 3, कॅन्टोन्मेंट बोर्ड 2 आणि जिल्ह्याबाहेरील 8, अशा रुग्णांचा समावेश आहे.
बरे झालेली रुग्णसंख्या:66562
उपचार सुरू असलेले रुग्ण: 1051
मृत्यू:1039
एकूण रुग्णसंख्या:68652





