50 Rupee New Note: पन्नास रुपयांची नवी नोट बाजारात येणार; फक्त ‘हा’ एकच बदल होणार

मुंबई – रिझर्व बँकेने बुधवारी जारी केलेल्या माहितीनुसार रिझर्व बँक लवकरच पन्नास रुपयांच्या नव्या नोटा जारी करणार आहे. या नव्या नोटावर सध्याचे रिझर्व बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांची स्वाक्षरी असणार आहे.
मल्होत्रा यांनी डिसेंबर 2024 मध्ये रिझर्व बँकेच्या गव्हर्नर पदाचा कार्यभार स्वीकारला होता. त्या अगोदर शक्तिकांत दास रिझर्व बँकेचे गव्हर्नर होते. या नव्या सिरीजमधील नोटाचे डिझाईन जुन्या 50 रुपयांच्या नोटासारखेच आहे.
त्यामध्ये कसलाही बदल करण्यात आलेला नाही. मात्र स्वाक्षरी संजय मल्होत्रा यांची असणार आहे, असे रिझर्व बँकेने जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे.
पन्नास रुपयाची नवीन नोट जरी बाजारात येणार असली तरी सध्या बाजारात असलेल्या जुन्या 50 रुपयांच्या नोटा कार्यरत राहतील असे स्पष्टीकरण बँकेकडून देण्यात आले. रिझर्व बँकेने इतर नोटाबाबत या पत्रकात वक्तव्य केलेले नाही.



