नवनिर्वाचित खासदार अतुल राय यांना अटकेपासून संरक्षण नाही

नवी दिल्ली – बहुजन समाज पक्षाचे उत्तरप्रदेशातील नवनिर्वाचित खासदार अतुल राय यांच्यावर एका महाविद्यालयीन मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. त्यांच्यावर या प्रकरणात अटकेची कारवाई करण्यात येणार आहे. त्यांना या कारवाईपासून संरक्षण देण्यस सर्वोच्च न्यायालयाने आज नकार दिला.

राय यांच्यावतीने अटकपुर्व जामीनासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेण्यात आली होती. पण सरन्यायाधिश रंजन गोगोई यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने त्यांना अटकेपासून संरक्षण देण्यास नकार दिला. सदर पीडित युवती वाराणसीतील आहे. राय यांनी आपल्या पत्नींची भेट घालून देण्याच्या उद्देशाने या मुलीला स्वताच्या घरी नेले आणि तिथे तिच्यावर बलात्कार करण्यात आला. या प्रकरणी एक मे रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राय यांच्या वकिलांनी उत्तरप्रदेशातील उच्च न्यायालयातून अटकपुर्व जामीन मिळवण्याचा प्रयत्न केला पण त्यांना तो मिळाला नाही त्यामुळे त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here