Newasa News : नागापूरात सैनिकांचा सेवापूर्ती सन्मान सोहळा उत्साहात संपन्न

नेवासा : नेवासा तालुक्यातील नागापूर येथील श्री काल नागनाथ देवस्थान परिसरात मंगळवारी एक गौरवशाली सन्मान सोहळा संपन्न झाला. भारतीय सैन्यात 22 वर्षे निष्ठेने आणि अखंड देशसेवा करून सेवानिवृत्त झालेल्या नामदेव मुरलीधर कापसे, पोपट पांडुरंग कापसे आणि अण्णासाहेब गोरक्षनाथ नवथर यांच्या सन्मानार्थ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी आमदार विठ्ठलराव लंघे-पाटील उपस्थित होते, तर प्रमुख अतिथी म्हणून अनेक मान्यवर हजर होते. यावेळी ज्ञानेश्वर गोरक्षनाथ नवथर आणि दीपक सदाशिव आढागळे यांचाही विशेष सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला अशोक चौधरी (अध्यक्ष, कोअर कमिटी त्रिदल सैनिक संघ, महाराष्ट्र), ॲड. विश्वासराव काळे-पाटील, भाऊसाहेब काळे, बाबासाहेब मच्छिंद्र काळे, ॲड. संदीप कापसे, दिनकर कापसे, अर्जुन कापसे, बाबासाहेब नवथर, तुषार काळे, राजाराम कापसे यांच्यासह ग्रामस्थ आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उपस्थित मान्यवरांनी सेवानिवृत्त सैनिकांच्या देशभक्ती आणि समर्पणाचे कौतुक करत त्यांचे मनापासून अभिनंदन केले. या सन्मान सोहळ्याने गावात उत्साहाचे आणि अभिमानाचे वातावरण निर्माण झाले.





