Newasa News : यशवंतराव चव्हाण डेंटल कॉलेजच्या वतीने नेवासा येथे शेकडो वारकऱ्यांसाठी दंत चिकित्सा शिबिराचे आयोजन
हिल्यानगर येथील यशवंतराव चव्हाण डेंटल कॉलेजच्या वतीने वद्य एकादशीचे औचित्य साधून नेवासा (Newasa News) येथील संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर प्रांगणात घेतलेल्या दंत चिकित्सा शिबिरात शेकडो वारकऱ्यांची मोफत दंत चिकित्सा व मौखिक आरोग्य विषयक जनजागृती डॉ.कीर्ती आंधळकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

Newasa News : अहिल्यानगर येथील यशवंतराव चव्हाण डेंटल कॉलेजच्या वतीने वद्य एकादशीचे औचित्य साधून नेवासा (Newasa News) येथील संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर प्रांगणात घेतलेल्या दंत चिकित्सा शिबिरात शेकडो वारकऱ्यांची मोफत दंत चिकित्सा व मौखिक आरोग्य विषयक जनजागृती डॉ.कीर्ती आंधळकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
यावेळी झालेल्या (Newasa News) शिबीर प्रसंगी दर्शनासाठी आलेल्या वारकरी भाविकांना मौखिक आरोग्याच्या समस्या बाबत प्रबोधन करण्यात आले.दंत समस्या असलेल्या गरजूंना पुढील दंतविषयक उपचारांकरीता अहिल्यानगर येथील श्री. यशवंतराव चव्हाण दंत महाविद्यालय येथे येण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले.तंदुरूस्त दातांसाठी योग्य पद्धतीने दातांची निगा राखण्यासाठी आवश्यक ती माहिती देऊन त्यांना मोफत टुथब्रश आणि टुथपेस्ट चे वाटप करण्यात आले.
डॉ.कीर्ती आंधळकर यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या (Newasa News) दंत तपासणी शिबिरात समृद्धी आंबेडकर, सच्चिदानंद आंधळे,वेदांत अंधुरे,क्षितिज बनकर,मानसी भंडारी,प्रज्ञा भराटे,वैष्णवी भोजने,भावना भोसले,जुई ढोले,पायल डिसले,सानिका चहाड,सौ. सुनिता दातीर यांनी सहभाग नोंदवून मोलाची कामगिरी बजावली.
वारकऱ्यांची मोफत दंत चिकित्सा करून मार्गदर्शन केल्याबद्दल संत ज्ञानेश्वर महाराज देवस्थानचे प्रमुख मार्गदर्शक वेदांताचार्य ह.भ.प देविदासजी महाराज म्हस्के शास्त्री,विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष माजी आमदार पांडुरंग अभंग,विश्वस्त ज्ञानेश्वर माऊली शिंदे,कृष्णाभाऊ पिसोटे, कैलास जाधव,जनसंपर्क अधिकारी भैय्या कावरे यांनी यशवंतराव चव्हाण डेंटल कॉलेजच्या टीमला धन्यवाद देत आभार मानले.






