Newasa News : नेवासा येथे 33 सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सत्कार समारंभ संपन्न

नेवासा : लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या 33 सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सत्कार समारंभ शनिवार (दि.28 जून 2025) रोजी दुपारी 2 वाजता कारखान्याच्या सभागृहात पार पडला. कारखान्याचे अध्यक्ष माजी आमदार डॉ. नरेंद्र घुले पाटील यांच्या हस्ते हा सत्कार करण्यात आला.
या समारंभाला संचालक माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील, उपाध्यक्ष माजी आमदार पांडुरंग अभंग, संचालक अॅड. देसाई देशमुख, काकासाहेब नरवडे, काशीनाथ नवले, प्रा. नारायण म्हस्के, अशोकराव मिसाळ, दादासाहेब गंडाळ, शिवाजी कोलते, भाऊसाहेब कांगुणे, मछिंद्र म्हस्के, जनार्दन कदम, पंडितराव भोसले, विकास नन्नवरे, बबनराव भुसारी, सखाराम लव्हाळे, संतोष पावसे, कार्यकारी संचालक अनिल शेवाळे, सचिव रवींद्र मोटे, प्रशासकीय अधिकारी कल्याणराव म्हस्के, विलासराव लोखंडे, कामगार अधिकारी बाळासाहेब डोहाळे, कामगार संघटनेचे सचिव संभाजी माळवदे, पोपट उगले आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कामगार संचालक सुखदेव फुलारी यांनी केले, तर आभार प्रदर्शनही त्यांनीच केले.
सेवानिवृत्त कर्मचारी
कारभारी दरवडे, रामकिसन माने, हरीभाऊ आरगडे, नामदेव शिंदे, विठ्ठल खाटीक, सुरेश आहेर, अशोक मिसाळ, दादासाहेब पोटे, हरीचंद्र सागडे, बापूसाहेब पानसंबळ, रघुनाथ गिर्हे, भाऊसाहेब फुलारी, बाळासाहेब मते, दशरथ मिसाळ, मिनानाथ ओंबळे, बाळासाहेब कांबळे, रामराव देशमुख, रज्जाक शेख, गोरख नजन, जयवंत काळे, अर्जुन कचरे, योसेफ काळे, सोपान रोडगे, आजिनाथ शिरसाठ, अर्जुन नागुडे, आण्णासाहेब दरंदले, भाऊराव वाघमोडे, नारायण पांडे, नामदेव वाघ, दत्तात्रय वाळुंजकर, उत्तम मिसाळ, गोवर्धन मोटकर, अशोक आरगडे.





