Newasa News : ज्ञानेश्वर माउलींच्या आषाढी पायी दिंडी सोहळ्यातील वारकऱ्यांना 40 हजार लाडूंचे वाटप!
संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माउलींच्या आषाढी पायी दिंडी सोहळ्याचे पंढरपूरकडे (Newasa News) प्रस्थान झाले असून, या पवित्र वारीतील वारकऱ्यांच्या स्वागतासाठी आणि आरोग्यासाठी स्थानिक भूमिपुत्रांनी घेतलेल्या पुढाकाराचे मोठे कौतुक होत आहे.

Newasa News : संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माउलींच्या आषाढी पायी दिंडी सोहळ्याचे पंढरपूरकडे (Newasa News) प्रस्थान झाले असून, या पवित्र वारीतील वारकऱ्यांच्या स्वागतासाठी आणि आरोग्यासाठी स्थानिक भूमिपुत्रांनी घेतलेल्या पुढाकाराचे मोठे कौतुक होत आहे.
नेवासे येथील भूमिपुत्र, शिवसेना नेते तथा पंचगंगा उद्योग समूहाचे प्रमुख प्रभाकर (काका) शिंदे यांनी या दिंडी सोहळ्यातील वारकऱ्यांची विशेष काळजी घेत सुमारे ४० हजार लाडूंचे वाटप केले आहे.
तसेच वारकऱ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने संपूर्ण दिंडी काळात अहोरात्र २४ तास रुग्णवाहिका (Newasa News) सेवा उपलब्ध करून दिली आहे. आपल्याच पुण्यभूमीतील वारकऱ्यांची अशी आस्थेने काळजी घेतल्यामुळे या पवित्र दिंडी सोहळ्यातील भाविक-भक्तांतून पंचगंगा उद्योग समूहाचे भरभरून कौतुक केले जात आहे.
संत ज्ञानेश्वर माउली पायी दिंडी पालखी सोहळ्याचे छत्रपती संभाजीनगर – अहिल्यानगर महामार्गांवरील माळीचिंचोरा फाटा येथे नुकतेच आगमन झाले. यावेळी पंचगंगा उद्योग समूहाच्या वतीने फटाक्यांच्या आतिषबाजीत आणि ढोल-ताशांच्या निनादात या दिंडीचे अत्यंत उत्साही आणि भारावलेल्या वातावरणात स्वागत करण्यात आले.
याप्रसंगी संत ज्ञानेश्वर मंदिराचे प्रमुख वेदांतचार्य ह.भ.प. देविदास महाराज म्हस्के यांचे पंचगंगा उद्योग समूहाचे प्रमुख प्रभाकर (काका) शिंदे, आत्मदीप हॉस्पिटलचे प्रमुख डॉ. अविनाश काळे आणि इतर विविध मान्यवरांनी भाविकतेने संत पूजन केले. या स्वागतादरम्यान वारीतील सर्व वारकऱ्यांना महाप्रसाद म्हणून सुमारे ४० हजार बुंदीच्या लाडूंचे वाटप करण्यात आले.
या पायी दिंडी सोहळ्याच्या (Newasa News) तीर्थक्षेत्र नेवासे ते पंढरपूर अशा संपूर्ण मार्गावर वारकऱ्यांच्या आरोग्याची कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी विशेष काळजी घेतली जात आहे. नेवासे फाटा येथील आत्मदीप हॉस्पिटलचे प्रमुख डॉ. अविनाश काळे आणि पंचगंगा उद्योग समूहाचे संचालक बाळासाहेब शिंदे यांच्या वतीने वारीतील भाविकांसाठी २४ तास रुग्णवाहिका सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
या सेवेअंतर्गत रुग्णवाहिकेसोबत तज्ज्ञ डॉक्टर आणि परिचारिका अहोरात्र तैनात असून, वारकऱ्यांच्या प्राथमिक प्रथमोपचारासाठी औषधी, गोळ्या आणि मलमपट्टीची संपूर्ण मोफत सोय करण्यात आली आहे.
पंचगंगा शुगर अँड पॉवर प्रायव्हेट लिमिटेड आणि आत्मदीप हॉस्पिटलच्या वतीने सुरू करण्यात आलेली ही २४ तास रुग्णवाहिका सेवा केवळ काही अंतरापुरती मर्यादित नसून, संपूर्ण वारी कालावधीमध्ये जोपर्यंत सर्व दिंड्या पंढरपूरला पोहोचत नाहीत आणि आषाढी यात्रा सुरक्षितपणे समाप्त होत नाही, तोपर्यंत अविरतपणे सुरूच राहील, अशी माहिती डॉ. अविनाश काळे व पंचगंगा उद्योग समूहाच्या वतीने देण्यात आली आहे. या रुग्णसेवा आणि अन्नदानाच्या उपक्रमामुळे वारकऱ्यांनी पंचगंगा समूहाप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे.






