New Zealand : पंतप्रधान जेसिंडा अर्डर्न यांचा तडकाफडकी राजीनामा

वेलिंग्टन – न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा अर्डर्न यांनी तडकाफडकी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. (New Zealand Prime Minister Jacinda Ardern resigns) न्यूझीलंडच्या पहिल्या महिला पंतप्रधान आणि डाव्या विचाराच्या कट्टर पुरस्कर्त्या असलेल्या जेसिंडा अर्डर्न यांनी सामुदायिक हिंसाचार आणि करोनाच्या साथीच्या काळात देशातील परिस्थिती कुशलतेने हाताळली होती. त्याबद्दल त्यांचे जागतिक पातळीवरून कौतुक करण्यात आले होते.
पंतप्रधानपद साडे पाच वर्षे सांभाळल्यानंतर देशांतर्गत विरोधकांनी केलेल्या कडवट टीकेमुळे त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या राजीनाम्यामुळे न्युझीलंडच्या 50 लाख लोकसंख्येला धक्का बसला आहे. दिनांक 7 फेब्रुवारी हा आपल्या पंतप्रधानपदाचा अखेरचा दिवस असेल, असे अर्डर्न यांनी पाणावलेल्या डोळ्यांनी प्रसार माध्यमांना सांगितले.
“मला माहित आहे की हे काम काय करायला लावते, आणि माझ्याकडे यापुढे या कामाला न्याय देण्यासाठी पुरेसे बळ नाही, मला माहित आहे. हे इतके सोपे आहे.”
– जेसिंडा अर्डर्न (पंतप्रधान, न्यूझीलंड)
तरुणाईच्या रोल मॉडेल
जेसिंडा अर्डर्न या 2017 मध्ये वयाच्या अवघ्या 37 व्या वर्षी न्यूझीलंडच्या पंतप्रधान बनल्या तेंव्हा त्या देशातील युवकांसाठी एक प्रेरणास्थान बनल्या होत्या. नव्या पिढीच्या नेतृत्वाच्या त्या प्रतिक बनल्या होत्या, त्यावेळी त्यांनी अर्धवेळ डीजे म्हणून काम केले होते आणि बहुतांश राजकीय नेतृत्वाप्रमाणे त्या देखील अविवाहित राहिल्या होत्या.
https://wordpress-1295094-4705890.cloudwaysapps.com/ncp-criticizes-the-governance-of-the-shinde-fadnavis-government-davos23/
जगभरात उजव्या विचारसरणीचा लोकवाद ऐनभरात असताना जेसिंडा अर्डर्न यांनी मध्यममार्गी-डाव्या विचारसरणीची कास धरली. 2050 पर्यंत कार्बन उत्सर्जन शून्य करण्याचे उद्दिष्ट असलेल्या विधेयकाचा त्यांनी पाठपुरावा केला. शस्त्रबंदीकडे कटाक्ष ठेवला आणि 18 महिन्यांपर्यंत करोनाच्या साथीला न्यूझीलंडमध्ये शिरकाव करू दिला नाही.





