न्यूझीलंडची सायकलपटू ऑलिव्हिया पोडमोअरचा आकस्मात मृत्यू
Updated On:

वेलिंग्टन – न्यूझीलंडची महिला सायकलपटू ऑलिव्हिया पोडमोअरचा आकस्मात मृत्यू झाला आहे. ऑलिव्हिया केवळ 24 वर्षांची होती.
तिने 2016 सालच्या रिओ ऑलिम्पिकबरोबरच 2018 सालच्या राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये सहभाग घेतला होता. नुकत्याच टोकियोत झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धांसाठी मात्र, ती पात्र ठरू शकली नव्हती.
येथील राहत्या घरी ऑलिव्हियाचा मृतदेह संशयास्पदरीत्या आढळून आला आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. तिचा मृत्यू नैसर्गिक नसल्याचा पोलिसांचा कयास असून सध्या या प्रकरणाचा तपास सुरु आहे.





