आयसीसीच्या स्पर्धेचे दोन दशकांनंतर विजेतेपद
Updated On:

साउदम्पटन – भारताचा पराभव करत न्यूझीलंडने बुधवारी आयसीसीच्या पहिल्यावहिल्या कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. आयसीसीने आयोजित केलेल्या स्पर्धांमध्ये जवळपास 21 वर्षांनी न्यूझीलंडने विजेतेपद मिळवले आहे.
बुधवारी झालेल्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडने भारतीय संघाचा 8 गडी राखून पराभव केला. आयसीसीतर्फे प्रथमच या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
तब्बल 21 वर्षांनंतर न्यूझीलंडच्या संघाने आयसीसीचे विजेतेपद जिंकले आहे. 2000 साली झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडने टीम इंडियाला पराभूत केले.
न्यूझीलंडच्या वेगवान गोलंदाजांनी भारतीय संघाचे सर्व 20 फलंदाज बाद केले. मात्र, याच क्षेत्रात भारतीय संघ कमी पडला.





