Jayant Patil : राज्याच्या राजकारणात नवा सस्पेन्स! अर्थमंत्री पदाचा प्रश्न, जयंत पाटील हसले अन् म्हणाले….
Jayant Patil : या सगळ्या चर्चा सुरू असताना दुसरी एक चर्चा रंगली आहे ती म्हणजे जयंत पाटील यांना अर्थमंत्री पद मिळणार असल्याची.

Jayant Patil : शरद पवार गटाचे नेते आणि माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी वर्षा निवासस्थानी जात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीनंतर पुन्हा राज्यात नव्या राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. महाविकास आघाडी फुटणार असल्याची चर्चा रंगू लागली आहे.
या चर्चा सुरू असताना मुख्यमंत्र्यांची भेट का घेतली याचं कारण जयंत पाटील यांनी दिलं आहे. त्यामुळे चर्चांना ब्रेक लागला आहे. असे असले तरी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत पडद्याआड मोठ्या घडामोडी घडत असल्याचे बोलले जात आहे. या सगळ्या चर्चा सुरू असताना दुसरी एक चर्चा रंगली आहे ती म्हणजे जयंत पाटील यांना अर्थमंत्री पद मिळणार असल्याची.
अर्थमंत्री पदाच्या प्रश्नावर जयंत पाटील यांनी दिलेली प्रतिक्रिया चर्चेत आहे. काल १४ रोजी वर्षा निवासस्थानी जयंत पाटलांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. याचवेळी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि खासदार प्रफुल पटेल देखील उपस्थित होते.
त्यामुळे राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चांना पुन्हा उधाण प्राप्त झाले. या चर्चांवर जयंत पाटील यांनी रात्री नेमकं काय काय घडलं याविषयी सांगितलं. याच दरम्यान पत्रकार परिषदेत तुम्हाला अर्थमंत्री पद मिळणार असल्याची चर्चा आहे असा प्रश्न विचारण्यात आला.
अर्थमंत्री पदाच्या प्रश्नावर जयंत पाटील काय म्हणाले?
या प्रश्नाचे उत्तर देताना जयंत पाटील सुरुवातीला हसले आणि म्हणाले , “मी कशाचाच विचार केला नाही. मग तुम्ही पुढचा विचार का करताय? असा प्रतिसवाल उपस्थित केला. खातेवाटपावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा अधिकार असतो. तुम्ही मुख्यमंत्र्यांचा अधिकार देखील घेत आहात. तुम्ही खूपच पुढचं विचारातंय. हा मुख्यमंत्री यांचा अधिकार आहेत. अर्थमंत्रिपदाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ठरवत असतात.”
मुख्यमंत्र्यांसोबत तिन्ही नेत्यांची बैठक झाल्याची चर्चा
दरम्यान, जयंत पाटील, सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल या तिन्ही नेत्यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबत जवळपास सव्वा तास चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तसेच मुख्यमंत्र्यांच्या भेटीपूर्वी जयंत पाटील, सुनील तटकरे, प्रफुल पटेल यांची वेगळी बैठक झाल्याचीही सूत्रांची माहिती आहे.
Russia Ukraine War: ‘मोदींनी पुतिन यांना अणुहल्ल्यापासून रोखलं’ ; पोलंडच्या मंत्र्याचा मोठा दावा






