EPFO New Rules: आजपासून बदलला PF चा ‘हा’ मोठा नियम, खातेधारकांना फायदा होणार

EPFO New Rules : तुमच्या भविष्य निर्वाह निधीशी (Provident Fund) संबंधित मोठा नवीन नियम आजपासून म्हणजेच 1 एप्रिल 2024 पासून लागू झाला आहे. आजपासून लागू झालेल्या नवीन नियमाचा पीएफ ग्राहकांना मोठा फायदा होणार आहे.
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेत (EPFO) 1 एप्रिलपासून मोठा बदल करण्यात आला आहे. आतापर्यंत, नोकरी बदलताना, तुम्हाला तुमच्या पीएफ खात्यात जमा केलेले पैसे ट्रान्सफर करावे लागायचे. त्यासाठी एक फॉर्म भरून जमा करावा लागणार होता. पण आता त्याचे नियम बदलले आहेत.
आता पीएफ ट्रान्सफरचा त्रास संपला आहे. आतापासून नोकरी बदलल्यावर पीएफ आपोआप ट्रान्सफर होईल. म्हणजेच पीएफ ट्रान्सफर करण्यासाठी फॉर्म 31 (Form 31) भरण्याची गरज नाही.
तुम्ही आर्थिक वर्ष 2025 पासून नोकरी बदलल्यास, तुमचे पीएफ खाते आपोआप दुसऱ्या कंपनीकडे (नियोक्ता) हस्तांतरित केले जाईल. यामुळे पीएफ खातेधारकांचे काम अधिक सोपे होणार आहे.
EPF नियमांनुसार, कर्मचाऱ्यांना त्यांच्या मूळ पगाराच्या 12 टक्के पीएफसाठी योगदान द्यावे लागते आणि नियोक्त्यांना देखील या योगदानाच्या बरोबरीचे योगदान द्यावे लागते.





