New Rules From 2025 : सर्वसामान्यांच्या खिशाला लागणार कात्री ! 1 जानेवारीपासून ‘या’ नियमांमध्ये होणार बदल

2024 हे वर्ष सरायला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. येत्या 1 जानेवारीपासून काही नियमांमध्ये बदल करण्यात येणार आहे. या सगळ्या नियमांचा सर्वसामान्यांच्या खिशावर परिणाम होणार आहे. चला तर मग जाणून घेऊया नवीन वर्षात कोणत्या नियमांमध्ये बदल होणार आहेत.
1) सेन्सेक्सची मासिक एक्स्पायरी
1 जानेवारी 2025 पासून सेन्सेक्स, बँकेक्स आणि सेन्सेक्स 50 ची मासिक एक्स्पायरी प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या मंगळवारी होईल. सेन्सेक्सचे साप्ताहिक करारही शुक्रवारऐवजी मंगळवारी संपतील. सध्या, सेन्सेक्सची मासिक मुदत प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या शुक्रवारी असते, तर बँकेक्सचे मासिक करार दर महिन्याच्या शेवटच्या सोमवारी संपतात आणि सेन्सेक्स 50 चे करार दर महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी संपतात.
2) कारच्या किमती वाढणार
1 जानेवारीपासून कारच्या किमतींमध्ये वाढ होणार आहे. टाटा मोटर्स, मारुती सुझुकी, ह्युंदाई, महिंद्रा, मर्सिडीज-बेंझ, होंडा, ऑडी इत्यादी अनेक कार कंपन्यांनी आपल्या गाड्या महाग करणार असल्याचे आधीच जाहीर केले आहे.
3) ईपीएफओकडून दिलासा
नवीन वर्षात EPFO पेन्शनवर मोठा दिलासा मिळणार आहे. नव्या नियमानुसार आता पेन्शनधारक देशातील कोणत्याही बँकेतून पेन्शन काढू शकणार आहेत. यासाठी त्यांना कोणत्याही अतिरिक्त पडताळणीची गरज भासणार नाही.
4) यूपीआय 123Pay
नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने नवीन वर्षात UPI 123Pay च्या मर्यादेमध्ये वाढ केली आहे. आत्तापर्यंत या पेमेंट सेवेद्वारे कमाल 5,000 रुपयांपर्यंतचे व्यवहार करण्यात येत होते मात्र आता नवीन वर्षात त्याची मर्यादा 10 हजार रुपयांपर्यंत वाढवण्यात येणार आहे.
5) एलपीजी किंमत
एलपीजीच्या किमती प्रत्येक महिन्याच्या पहिल्या दिवशी अपडेट केल्या जातात. या दिवशी तेल कंपन्या एलपीजीच्या किमतीत काही बदल करतात यावरून एलपीजीच्या किंमती ठरत असतात.
6) कृषी कर्ज
भारतीय रिझर्व्ह बँकेने नववर्षानिमित्त शेतकऱ्यांना मोठी भेट दिली आहे. रिझर्व्ह बँकेने शेतकऱ्यांना हमीशिवाय कर्ज देण्याच्या मर्यादेमध्ये वाढ केली आहे. आतापर्यंत ही मर्यादा 1.60 लाख रुपये होती.मात्र आता ती 2 लाख रुपये करण्यात आली आहे.




