Spirit New Release Date : प्रभासच्या ‘स्पिरीट’ची नवीन रिलीज डेट जाहीर! दिग्दर्शकाने साधला ‘हा’ शुभमुहूर्त
Spirit New Release Date : आता या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेबाबत नवी माहिती समोर आली आहे.

Spirit New Release Date : अभिनेता प्रभासच्या बहुप्रतीक्षित ‘स्पिरीट’ या चित्रपटाची चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता आहे. दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा यांच्या या आगामी चित्रपटाचे पोस्टर समोर आल्यानंतर प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढली आहे.
मात्र, चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी चाहत्यांना मोठी प्रतीक्षा करावी लागणार असल्याने काहींनी याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. आता या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेबाबत नवी माहिती समोर आली आहे.
‘अॅनिमल’ या ब्लॉकबस्टर चित्रपटाचे दिग्दर्शन करणारे संदीप रेड्डी वांगा ‘स्पिरीट’च्या माध्यमातून पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर दमदार कथा सादर करण्यासाठी सज्ज आहेत. हा बिग बजेट चित्रपट २९ ऑक्टोबर २०२७ रोजी दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.
याच काळात ‘रामायण पार्ट २’ देखील प्रदर्शित होणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे हे दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर एकमेकांना टक्कर देण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. असे झाल्यास २०२७ मधील ही सर्वांत मोठी बॅाक्स अॅाफिस क्लॅश मानली जाईल.
View this post on Instagram
या चित्रपटात सुरुवातीला प्रभाससोबत अभिनेत्री दीपिका पदुकोण दिसणार होती. मात्र, दिग्दर्शक आणि अभिनेत्रीमध्ये मतभेद झाले आणि तिच्या जागी तृप्ती डिमरीची निवड करण्यात आली.
चित्रपटाच्या पोस्टरमुळे प्रभास आणि तृप्ती यांच्या जोडीबाबत चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. ‘स्पिरीट’मध्ये विवेक ओबेरॉय आणि ऐश्वर्या देसाई यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका असल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, संदीप रेड्डी वांगा ‘अॅनिमल पार्क’ या ‘अॅनिमल’च्या सिक्वेलवरही काम करत आहेत. त्यामुळे त्याच्या या चित्रपटाकडे देखील प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे.
Dhruv Rathee: लंडनमध्ये ध्रुव राठींविरोधात घोषणाबाजी ; दोन गट आमनेसामने, पोलिसांचा हस्तक्षेप





