संजय मल्होत्रा आरबीआयचे नवे गव्हर्नर; जाणून घ्या त्यांच्याविषयी अधिक माहिती…

नवी दिल्ली : केंद्र सरकारकडून नुकतीच नव्या आरबीआय गव्हर्नरची घोषणा करण्यात आली आहे. संजय मल्होत्रा पुढील आरबीआय गव्हर्नर असणार आहेत. पुढील तीन वर्ष ते या पदावर असणार आहेत. शक्तिकांत दास यांचा कार्यकाळ 10 डिसेंबर संपणार आहे. तर संजय मल्होत्रा उद्यापासून अर्थात 11 डिसेंबर रोजी पदभार स्वीकारणार आहेत.
शक्तिकांत दास यांचा कार्यकाळ वाढवण्यात येईल अशी चर्चा होती मात्र मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीकडून सध्याला महसूल सचिव असलेल्या संजय मल्होत्रा यांची नियुक्ती नव्या आरबीआय गव्हर्नरपदी करण्यात आली आहे. कोण आहेत नवीन गव्हर्नर संजय मल्होत्रा जाणून घेऊया…
कोण आहेत संजय मल्होत्रा?
संजय मल्होत्रा हे सध्या महसूल सचिव या पदावर कार्यरत आहेत.
मल्होत्रा यांची आता रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपदी नियुक्ती झाली आहे. पुढील तीन वर्षांसाठी ते हे पद सांभाळतील.
संजय मल्होत्रा हे 1990 बॅचचे राजस्थान केडरचे IAS (भारतीय प्रशासकीय सेवा अधिकारी) आहेत.
त्यांनी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, कानपूर येथून कॉम्प्युटर सायन्समध्ये अभियांत्रिकी पदवी घेतली आहे.
मल्होत्रा यांनी प्रिन्स्टन युनिव्हर्सिटी, यूएसए येथून पब्लिक पॉलिसी या विषयात पदव्युत्तर पदवी प्राप्त केली आहे.



