Vijay Varma : अभिनेता विजय वर्माच्या आयुष्यात नव्या साथीदाराची एन्ट्री? ‘या’ अभिनेत्रीसोबतचा व्हिडीओ व्हायरल

Actor Vijay Verma : अभिनेता विजय वर्मा गेल्या अनेक महिन्यांपासून अभिनेत्री तमन्ना भाटियासोबत रिलेशनमध्ये असल्याची बातमी येत होत्या. त्यानंतर दोघांच्याही ब्रेकअपची बातमी समोर आली होती. अशातच आता सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत असून विजय वर्मा पुन्हा एकदा प्रेमात पडला असल्याचे बोलले जात असून, त्याच्या नव्या रिलेशनशिपच्या चर्चांना उधाण आले आहे.
विजय वर्मा ‘दंगल’ गर्ल अभिनेत्री फातिमा सना शेखला हिला डेट करत असल्याच्या बाताम्या येत आहेत. नुकतेच दोघेही एका कॅफेतून बाहेर पडत असताना पापाराझींनी त्यांचा एकत्रित असतानाचा एक व्हिडीओ शूट केला असून हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामुळे आता विजय आणि फातिमाच्या रिलेशिनशिपच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.
View this post on Instagram
या व्हिडीओमध्ये विजय वर्मा आणि फातिमा सना शेख हसताना आणि एकमेकांना मिठी मारताना दिसत आहेत. यानंतर, दोघेही पापाराझींसमोर पोझ देताना दिसत आहेत. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांना आश्चर्यचकित केले आहे मात्र, दोघांनाकडून आतापर्यंत त्यांच्या नात्याबद्दल काहीही सांगण्यात आलेले नाही.
विजय वर्मा आधी तमन्ना भाटियासोबत रिलेशनशिपमध्ये होता. दोघांनीही २०२३ मध्ये ‘लस्ट स्टोरीज’ या वेबसिरीजमध्ये एकत्र काम केले होते. त्यानंतर गेल्या अनेक महिन्यांपासून दोघेही एकमेकांना डेट करत होते. या वर्षी मार्चमध्ये दोघेही वेगळे झाल्याची बातमी समोर आली होती.
हेही वाचा : सौरव गांगुलीच्या बायोपिकमध्ये दिसणार राजकुमार राव





