ओझर : पुणे जिल्हा शिक्षण मंडळ , पुणे आयोजित जिल्हास्तरिय क्रीडा स्पर्धत न्यू इंग्लिश स्कूल शिरोली बु॥ विद्यालयाने घवघवीत यश संपादन केले आहे,शालेय गुणवत्तेबरोबरच विद्यार्थांमध्ये क्रीडा विषयक आवड निर्माण होऊन राज्य -राष्ट्रीय -आंतर राष्ट्रीय खेळाडू निर्माण व्हावेत यासाठी दरवर्षी या स्पर्धा आयोजित केल्या जातात. या स्पर्धत विद्यालयाच्या खेळाडूंनी नेत्रदिपक कामगिरी केल्याची माहिती विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रसाद हांडे यांनी दिली. १४ वर्षा खालील मुले मुली क्रीडा प्रकारात १०० मी . धावणे कु .आराध्या अनिल थोरवे द्वितीय , २०० मी . धावणे कु . शर्वरी विवेक थोरवे प्रथम , ६०० मी . धावणे सोमनाथ विक्रम बर्डे द्वितीय , कुस्ती ६२ किलो वजनी गट कु . शर्वरी गणेश नवले प्रथम , ओम मारूती कदम प्रथम . १७ वर्षा खालील मुले मुली गोळ फेक कु . गायत्री बाळासाहेब मोरे , कुस्ती ५७ किलो वजनी गट कु . साक्षी कैलास पारवे द्वितीय . ४ X १०० रिले स्पर्धत कु .आराध्य थोरवे , शर्वरी थोरवे , प्रणिता सुपे , अश्विनी धोत्रे , सानवी सपकाळ यांच्या संघाने द्वितीय क्रमांकाने विजय प्राप्त केला आहे . या खेळाडूंना मार्गदर्शन सुनिल विरणक , शोभा कवडे , तुकाराम निधन यांनी केले .विद्यालयाचे पर्यवेक्षक गणेश राऊत, शिक्षक शिक्षकेतर वृंद , समस्त ग्रामस्थ शिरोली बु॥ यांनी यशस्वी विद्यार्थ्याचे अभिनंदन करीत पुढील यशस्वी वाटचालीस शुभेच्छा दिल्या .