जम्मूत साकारणार नवीन विमानतळ इमारत
Updated On:

जम्मू – जम्मू विमानतळाला नवीन टर्मिनल इमारत मिळणार आहे. 25 हजार चौरस मीटरवर ही इमारत उभी राहणार असून त्यासाठी राज्य प्रशासनाने 122 एकर जमीन एअरपोर्ट ऍथॉरिटी ऑफ इंडियाला प्रदान केली आहे.
या नव्या टर्मिनल इमारतीच्या संबंधात आज झालेल्या बैठकीत विभागीय आयुक्तांनी ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की या जागेचे डिमार्केशन झाले असून ती जागा आता एअरपोर्ट ऍथॉरिटीकडे सुपूर्त करण्यात आली आहे. त्यामुळे नवीन इमारत उभारण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे.
जम्मू विमानतळाच्या रनवेचीही लांबी वाढवण्यात येणार आहे. त्यामुळे कितीही मोठी विमाने येथे उतरू शकणार आहेत. जी जागा एअरपोर्ट ऍथॉरिटीकडे सुपूर्त करण्यात आली आहे ती जागा खाली करण्याचा आदेश तेथील संबंधितांना देण्यात आला आहे. या बैठकीत दिल्ली-कटरा मार्गाच्या पुढील कामाचाही आढावा घेण्यात आला.

