एप्रिलमध्ये २.८ लाख गुंतवणूकदारांची म्युच्युअल फंडासाठी नवी खाती (भाग-२)

मल्टी कॅप आणि प्राप्तीकर सवलतीच्या योजनांना पसंती

एप्रिलमध्ये २.८ लाख गुंतवणूकदारांची म्युच्युअल फंडासाठी नवी खाती (भाग-१)

ईएलएसएस योजनांसाठीच्या खात्यानंतर क्रम लागतो तो मल्टीकॅप फंडातील गुंतवणुकीच्या खात्यांचा. यासाठीच्या खात्यांची संख्या ८७.१८ लाख इतकी आहे. ही संख्या १०.५ टक्के इतकी आहे. लार्ज कॅप फंडातील गुंतवणुकीसाठीच्या खात्यांमधील १.२६ लाख कोटी रुपयांच्या व्यवस्थापनासाठी ८१.७९ लाख खाती चालू आहेत.

डेट वर्गातील सर्वाधिक खात्यांची संख्या लिक्विड फंडात असल्याचे दिसून येते. लिक्विड फंडातील गुंतवणुकीसाठी १४ लाख ५१ हजार खाती आहेत. म्युच्युअल फंडातील एकूण खात्यांचा विचार करता हे प्रमाण १.८ टक्के इतके आहे. त्यापाठोपाठ कमी कालावधीच्या (लो ड्युरेशन फंडस् ) आणि अति कमी कालवधीच्या (अल्ट्रा शॉर्ट ड्युरेशन) योजनांचा समावेश होतो. लो ड्युरेशन फंड योजनांमध्ये ९.२२ लाख खाती आहेत तर अल्ट्रा शॉर्ट ड्युरेशन फंडात ५.९१ लाख खाती आहेत. डेट वर्गवारीत एकूण खात्यांची संख्या आहे ५१.७६ लाख.

– चतुर

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here