नेवासा तालुका सुवर्णकार समाजाचा तहसील कार्यालयावर मूक मोर्चा

नेवासा – माजलगांव (जि.बीड) येथे एका साडेपाच वर्षाच्या चिमुरडीवर झालेल्या अत्याचार प्रकरणी नेवासा तालुका सुवर्णकार समाजाच्यावतीने घटनेच्या निषेधार्थ सोमवार (दि.१४) रोजी दिवसभर दुकाणे बंद ठेवून नेवासा शहरातील डॉ. हेडगेवार चौक ते नेवासा तहसिल कार्यालयावर मुक मोर्चा काढून नेवासा तहसिलदार निवेदन दिले.
यावेळी सुवर्णकार संघटनेचे तालुकाध्यक्ष विजय दहिवाळकर यांच्या नेत्तृत्वाली मुक मोर्चा काढण्यात आला. तालुकाध्यक्ष दहिवाळकर म्हणाले की, साडेपाच वर्षाच्या चिमुरडीवर झालेल्या अत्याचाराची ही घटना मोठी निंदनीय असून समाज आणि संघटनेकडून या घटनेचा जाहिर निषेध करीत आहोत.
या प्रकरणातील आरोपीस त्वरीत कडक शासन करण्यात यावे व सदरील प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून नराधमास कठोरातील कठोर शिक्षा देण्याबाबत शासनाच्यावतीने वेळीच योग्य ती कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली. यावेळी मोठ्या संख्येने सुवर्णकार समाज या मुक मोर्चात सहभागी झाला होता.





