नेवासा: शेतकऱ्याने गळ्यात कांद्याची माळ अन् हातात दुधाची बाटली घेवून बजावला मतदानाचा अधिकार
Updated On:

नेवासा – वाकडी (ता.नेवासा) येथील शेतकरी भाऊसाहेब शिवाजी काळे उर्फ ठाकरे यांनी सोमवार (दि.१३) रोजी वाकडी येथील मतदान केंद्रावर जावून गळ्यात कांद्याची माळ आणि दुधाची बाटली हातात घेवून थेट अनोख्या पद्धतीने मतदान केले.
वाकडी येथील मतदान केंद्रावर दुधाची बाटली आणि कांद्याची माळ घालून मतदान करताना काळे यांच्याकडे अनेकांचे लक्ष यावेळी वेधले गेले होते.
याप्रसंगी त्यांनी आपली भावना व्यक्त करताना म्हणाले की, कांदा आणि दूधाने शेतकऱ्यांचे कसे नुकसान केले तसेच आपण सरकारचे लक्ष वेधण्यासाठी शेतकरी संघटनेचा एक पदाधिकारी आणि सेवक म्हणून शेतकऱ्यांसंदर्भात विशेष पद्धतीने निषेध नोंदवलेला आहे. त्यांच्या या अनोख्या पद्धतीने केलेल्या मतदानामुळे सर्वांचे लक्ष वेधले जावून दिवसभर चर्चा सुरु होती.





